मेंगाई देवीचा नवरात्रोत्सव उत्साहात; अतिदुर्गम तोरण्यावरुन छबीन्याची मिरवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2017 16:40 IST2017-10-01T16:32:28+5:302017-10-01T16:40:23+5:30

मेंगाई देवीचा नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावर्षी प्रथमच ७८ वर्षांनंतर मेंगाई देवीचा छबीना गडावर नेऊन वेल्ह्यात आणला आणि खंडीत झालेली  शिवकालीन परंपरा मावळ्यांनी सुरू केली.

Navaratri festival of Mengai Devi | मेंगाई देवीचा नवरात्रोत्सव उत्साहात; अतिदुर्गम तोरण्यावरुन छबीन्याची मिरवणूक

मेंगाई देवीचा नवरात्रोत्सव उत्साहात; अतिदुर्गम तोरण्यावरुन छबीन्याची मिरवणूक

ठळक मुद्देदसºयादिवशी देवीचे शिवकालीन दागीने, मौल्यवान अलंकार व देवीची मूर्ती यांची सन्मानपूर्वक पालखीतून गडावरुन वेल्ह्यात मिरवणूक काढली. तोरणा किल्ल्यावरील मेंगाई मंदिरात येथील तरुणांनी मशालींची सलामी दिलीयावर्षी प्रथमच गडावरील देवीसाठी वेल्हे ग्रामास्थांतर्फे नवीन पालखी अर्पण केली

वेल्हे  : तालुक्यातील जनतेची आणि समस्त मावळ्यांची कुलस्वामिनी व तोरणागडाची गडदेवता असलेल्या मेंगाई देवीचा नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावर्षी प्रथमच ७८ वर्षांनंतर मेंगाई देवीचा छबीना गडावर नेऊन वेल्ह्यात आणला आणि खंडीत झालेली  शिवकालीन परंपरा मावळ्यांनी सुरू केली.  मेंगाई देवस्थानचे मानकरी शंकर भुरुक यांच्या मार्गदर्शनाखाली यावर्षी शिवकालीन पद्धतीनुसार प्रथमच नवरात्रोत्सव संपन्न झाला आहे.   
दसºयादिवशी देवीचे शिवकालीन दागीने, मौल्यवान अलंकार व देवीची मूर्ती यांची सन्मानपूर्वक पालखीतून गडावरुन वेल्ह्यात मिरवणूक काढली. घटस्थापनेपासून ते विजायादशामीपर्यंत वेल्ह्यातील मेंगाई मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले. मेंगाई मंदिरात भाविकांची मोठ्या संख्येने गर्दी झाली होती. 
दसºयादिवशी गावामधून देवीच्या छाबिन्याची मिरवणूक काढण्यात आली. तसेच तोरणा किल्ल्यावरील मेंगाई मंदिरात येथील तरुणांनी मशालींची सलामी दिली.  गडावरील मंदिरात महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावर्षी प्रथमच गडावरील देवीसाठी वेल्हे ग्रामास्थांतर्फे नवीन पालखी अर्पण केली असून या पालखीतून शिवकालीन मौल्यवान दागिने, देवीचे अलंकार, गडावरून खाली आणून या पालखीची दसार्यादिवाशी गावातून  सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.
१९३९ सालापर्र्यंत गडाचे मानकरी व रखवालदार असलेली सर्व गडकरी मंडळी नवरात्रोत्सवानिमित्त गडावरील देवीचा उत्सव मोठ्या उत्साहाने पार पाडात. मात्र संस्थाने खालसा झाल्यानंतर १९४० पासून तोरणागड दुर्लक्षित झाला. यावेळी गडकºयांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी मेंगाई देवीला अर्पण केलेले दागिने, मौल्यवान अलंकार, सरकारजमा केले. तेव्हापासून काही काळ उत्सवाची परंपरा खंंडीत झाली होती. मात्र आता वेल्ह्यातील युवकांनी नवरात्रातील गडावरील मेंगाईचा उत्सव करण्यास मोठ्या प्रमाणात सुरुवात केली आहे.
- शंकर भुरुक, मानकरी, मेंगाई देवस्थान
बंद पडलेली परंपरा पुन्हा जिवंत करण्यासाठी वेल्ह्यातील ग्रामस्थांनी एकत्र येऊन लोकवर्गणी जमा करुन गडावरील देवस्थानसाठी नवीन पालखी बनवली. या पालखीला दसºयादिवशी देवीच्या चरणी अर्पण केले. या उत्सवासाठी देवीचे मानकरी शंकर  भुरुक, ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाश पवार, सुनिल राजीवडे, पुजारी ज्ञानेश्वर वेगरे, देवस्थान चे मानकरी संजय पवार- पाटील, रामचंद्र राजीवडे, मंगेश पवार, अनिल भुरुक, संतोष मोरे, वेल्ह्याच्या सरपंच कल्पना वेगरे, प्रकाश गायखे, विकास कदम आदींनी परिश्रम घेतले.

Web Title: Navaratri festival of Mengai Devi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.