शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

पुणेकरांना खुणावतोय निसर्ग

By admin | Updated: July 19, 2014 23:33 IST

हिरवा निसर्ग हा भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे, जीवनाचे गीत गा रे..

 पुणो : हिरवा निसर्ग हा भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे, जीवनाचे गीत गा रे..

4अशीच साद आज निसर्ग प्रत्येकाच्या मनाला घालत आहे. उशिरा का असेना पण पुणोकरांना दिलासा देत पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे एवढय़ा दिवस शुष्क झालेला निसर्ग टवटवीत झाला आहे. नवीनच फुललेली हिरवळ आणि बरसणा:या पाऊसधारा अनुभवण्याचा धम्माल ‘विकेंड प्लॅन’ केला जात आहे. 
4पुण्यनगरी शिक्षण, संस्कृतीसाठी जशी प्रसिद्ध आहे तसेच या शहराच्या आजुबाजूला अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत. जेथे एक किंवा दोन दिवसाची निसर्गसान्निध्याची सहल आयोजित करता येऊ शकते. अगदी जवळचे म्हणजे खडकवासला धरण, मुळशी धरण, सिंहगड ही ठिकाणो आपल्या सगळ्यांनाच माहीत आहेत. परंतु या पलीकडेही मस्त दुचाकीवर एक-दोन दिवसांची सहल आयोजित करण्यासारखी 15क्-2क्क् किलोमीटरच्या अंतरावर अनेक ठिकाणो आहेत.  
 
4वरंधा घाट - निसर्गरम्य, भरपूर धबधबे, वाफाळलेला चहा, गरमागरम भजी, कधी हलका तर कधी जोरदार सरी बरसणारा पाऊस, असा डोळ्यांद्वारे मनालाही गारवा देणारा वरंधा घाट आहे. हे ठिकाण पुण्यापासून 82 किलोमीटरवर आहे. भोरमार्गे गेल्यास अजून एक प्रेक्षणीय स्थळ अनुभवता येते. येथील राजवाडा अत्यंत सुदंर व नवा अनुभव देणारा आहे. मित्र-मैत्रिणींसोबत एका दिवसात जाऊन येण्याचे नियोजन करत असाल तर हा उत्तम पर्याय आहे.
 
4रायगड- छत्रपती शिवरायांच्या गौरवाने रायगडाला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झालेले आहेच; परंतु तेवढाच निसर्गसौंदर्याने भरलेला हा गड आहे. येथे ताम्हिणी घाटमार्गे महाडवरून जावे लागते. पुण्यापासून रायगड 125 किलोमीटर असून, ताम्हिणीपासून महाड 47 किलोमीटर व महाड पासून रायगड 25 किलोमीटर आहे. वाटेत महाड येथेदेखील बघण्यासारख्या बौद्धलेण्या व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सत्याग्रह केलेले चवदार तळे ही दोन ठिकाणो आहेत.
 
4राजगड - राजगड या ठिकाणाला ऐतिहासिक महत्त्व तर आहेच सोबत अप्रतिम सौंदर्यस्थळांचे वरदानही आहे. येथील बालेकिल्ला, सुवेळा, संजीवनी व पद्मावती या तीन माच्या, पद्मावती तलाव, नेढे, सईबाई स्मारक ही बघण्यासारखी ठिकाणो आहेत. ट्रेक करण्यासाठी उत्तम जागा आहे. परंतु पावसाळ्यात निसरडा होणारा रस्ता आणि उंचच उंच कठडे असल्याने अपघात होण्याची शक्यताही असते. त्यामुळे योग्य खबरदारी घेऊन येथे जाणो आवश्यक आहे. पुण्यापासून राजगड 70 किलोमीटर अंतरावर आहे. 
 
4राजमाची - पावसाळ्यात ट्रेक करायचा विचार आला, की मनात पहिले नाव राजमाचीचे आठवावे असे हे ठिकाण आहे. लोणावळ्यावरून पायी वर राजमाचीच्या दिशेने जावे लागते. मस्त कणीस, भजी खात हा प्रवास रमतगमत केला जातो. लोणावळ्यार्पयत जाताना अलीकडील स्टेशन मळवली आहे. येथे सुंदर सात धबधबे वाटेत लागतात. तसेच पुढे लोहगडाकडे जाण्याचा हा रस्ता आहे. राजमाचीचा ट्रेक ज्यांना शक्य नसेल त्यांच्यासाठी लोहगड हादेखील उत्तम पर्याय होऊ शकतो. राजमाची पुण्यापासून 1क्6 किलोमीटर अंतरावर आहे. 
 
4नाणोघाट - अत्यंत रम्य व मनोवेधक असे हे ठिकाण आहे. जुन्नर मार्गे येथे जावे लागते. हिरवळीचा आणि पावसाचा मनसोक्त आनंद घेता येण्यासारखी जागा आहे. वाटेत जुन्नर येथील निसर्ग आणि हिरवळ अनुभवत असतानाच तेथील बिबटय़ा निवारण केंद्र हे देखील एक बघण्यासारखे ठिकाण आहे. परंतु येथे पूर्वपरवानगी घेणो आवश्यक असते.
 
4शिवथरघळ -  संत रामदास स्वामी यांनी साधना केलेले व दासबोध लिहिलेले हे ठिकाण आहे. याचे आध्यात्मिक महत्त्व जेवढे मोठे आहे तेवढाच येथील निसर्ग डोळ्यांचे पारणो फेडणारा आहे. गड फार उंच नसला तरी ढग जणू येथे गालिचाप्रमाणो पसरलेले असतात. चहू बाजूंनी केवळ हिरवागार निसर्ग आणि मंजूळ आवाज करत कोसळणारे धबधबे, शांत आणि रम्य असे हे ठिकाण आहे. येथे वरंधा घाटमार्गे जावे लागते. हे अंतर पुण्यापासून 90 किलोमीटर आहे. 
 
4ताम्हिणी घाट - दुतर्फा उंच उंच वृक्षांच्या रांगा, समोर दिसणारा काळाभोर वळणावळणाचा रस्ता आणि वरून सुईप्रमाणो बोचणा:या पण त्यातही वेगळाच आनंद देणा:या पावसाचा थेंबांची बरसात अशी अनोखी अनुभूती घ्यायची असेल तर ताम्हिणी घाट उत्तम जागा आहे. चांदणी चौक, भूगावमार्गे गेलात तर 65 किलोमीटरचे अंतर आहे. वाटेत अनेक धबधबे लागतात. तेथे थांबून मनसोक्त भिजण्याचा आनंद घेता येतो. काही पठारी भागही आहेत. हे पठार फोटोग्राफीसाठी उत्तम ठिकाण असल्यामुळे नकळत पाऊले येथे थांबतात. घाट दुतर्फा झाडीने वेढलेला असल्याने येथे अंधार लवकर पडतो. त्यामुळे सायंकाळी 5 नंतर घाटात जाऊ नये किंवा तोर्पयत घाटातून खाली उतरावे हा सावधगिरीचा संदेश दिला जातो.