मेंदू, पाठींच्या दुखापतींबाबत जागृतीसाठी देशव्यापी मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:16 IST2021-02-05T05:16:31+5:302021-02-05T05:16:31+5:30

पुणे : मेंदू, पाठीच्या दुखापतीमुळे अपंगत्व येण्याचे आणि मृत्यूचे प्रमाणही मोठे आहे. दुखापतींचे प्रमाण वाढत असल्याने त्याबाबत जागृती करण्यासाठी ...

A nationwide campaign to raise awareness about brain and spinal cord injuries | मेंदू, पाठींच्या दुखापतींबाबत जागृतीसाठी देशव्यापी मोहीम

मेंदू, पाठींच्या दुखापतींबाबत जागृतीसाठी देशव्यापी मोहीम

पुणे : मेंदू, पाठीच्या दुखापतीमुळे अपंगत्व येण्याचे आणि मृत्यूचे प्रमाणही मोठे आहे. दुखापतींचे प्रमाण वाढत असल्याने त्याबाबत जागृती करण्यासाठी ‘स्पाईन सर्जन ऑफ इंडियां’तर्गत पुण्यासह भारतातील अस्थी शल्यविशारद एकत्र आले आहेत. मुंबई आणि पुण्यासह २० शहरांत ही मोहीम राबविली जाईल. पुण्यातील शाळा, महाविद्यालये आणि इतर संस्था यांसह किमान ५० संस्था या उपक्रमामध्ये सहभागी होणार आहेत.

“दुखापत ही जगातील सर्वात दुर्लक्षित समस्या आहे. डोके व मणक्याच्या दुखापतीमुळे मृत्यू आणि अपंगत्व येण्याचे भारतासह जगभरातील प्रमाण मोठे आहे. प्राथमिक प्रतिबंधात्मक प्रयत्नांकडे लक्ष वेधण्यासाठी देशभरात मोठी मोहीम राबवली जात आहे. यामुळे वर्तणुकीत बदल आणि निरोगी जीवनशैलीबाबत जागरूकता निर्माण होऊ शकेल,” असे असोसिएशन ऑफ स्पाइन सर्जन ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. एच. एस. छाबरा यांनी सांगितले.

या कार्यक्रमाअंतर्गत देशभरातील प्रशिक्षकांची फौज तयार करुन अनेक संस्था, शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये प्रशिक्षण आणि जागरूकता सत्रे घेतली जातील. सीटबेल्ट्स आणि हेल्मेटचा वापर, कार्यालये आणि शाळांमध्ये बसण्यायोग्य फर्निचर तयार करणे, प्रभावी सुरक्षा उपकरणे वापरण्याच्या गरजेवर भर, व्यायामाविषयी जागरूकता यावर भर दिला जाणार आहे.

मणका तज्ज्ञ डॉ. अमोल रेगे यांनी सांगितले की, रस्ते अपघात, घरगुती व औद्योगिक परिस्थिती, हिंसाचार इत्यादी कारणांमुळे अनेकदा दुखापती होतात. सुरक्षिततेच्या उपाययोजनांचा वाढता वापर, कायद्याची प्रभावी अंमलबजावणी आणि जनजागृती यावर लक्ष केंद्रित करणारा समर्पित दृष्टिकोन हा ओझे कमी करण्यास मदत करू शकेल.

Web Title: A nationwide campaign to raise awareness about brain and spinal cord injuries