शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
7
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
8
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
9
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
10
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
11
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
12
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
13
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
14
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
15
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
16
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
17
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
18
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
19
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
20
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी

राष्ट्रीय हरित लवादाचा पिंपरी महापालिकेला दणका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2020 12:08 IST

पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरात पवना, इंद्रायणी आणि मुळा अशा तीन नद्या आहेत..

ठळक मुद्देसांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाविरोधात जूनमध्ये उच्च न्यायालयात तक्रार दाखलमहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची महापालिकेला नोटीस

पिंपरी : महापालिकेतर्फे चिखली येथे इंद्रायणीच्या निळ्या पूररेषेत सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येणार असून महिन्याभरात प्रकल्प काढून घ्यावा, असा आदेश राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने महापालिकेला दिला आहे.  कारवाईचा अहवाल सादर करण्याचेही निर्देशही दिले आहेत. प्रकल्पाचे पाचच टक्के काम झाले आहे. ते काढून घेऊ असे महापालिका अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरात पवना, इंद्रायणी आणि मुळा अशा तीन नद्या आहेत. पर्यावरणाची हानी होऊ नये व इंद्रायणी नदीचे सौंदर्य अबाधित राहावे, यासाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाविरोधात जूनमध्ये फेडरेशन ऑफ रिव्हर रेसिडेन्सीने उच्च न्यायालयात तक्रार दाखल केली होती. हा प्रकल्प अनधिकृतपणे इंद्रायणी नदी पात्रालगत निळ्या पूररेषेत महापालिका उभारत आहे. याबाबत तक्रार करूनही महापालिकेने काम सुरूच ठेवले होते. त्यामुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार केल्यानंतर मंडळाने महापालिकेला नोटीस बजावली होती.  त्यानंतरही काम सुरूच राहिल्याने रिव्हर रेसिडेन्सीने हरित लवादाकडे न्याय मागितला होता. त्यावर सुनावणी होऊन लवादाने सविस्तर अहवाल मागविला. त्यानुसार जुलैला स्थळ पाहणी केली. त्यानंतर  प्रकल्पाला स्थगिती दिली होती. प्रकल्पाचे पाया भरणी व सीमाभिंत बांधणीचे काम पूर्ण झाले होते. यावर हरित लवादात सुनावणी झाली. दोघांची बाजू ऐकूण घेत हरित लवादाने हा प्रकल्प जमीनदोस्त करण्याचे आदेश महापालिकेला दिले आहेत. तसेच बांधकाम पाडल्यानंतर त्याचा अहवाल सादर करण्याचे निर्देशही दिले आहेत.माजी विरोधीपक्षनेते दत्ता साने म्हणाले, आर्थिक लाभासाठी भाजपने निळ्या पूररेषेत येत असतानाही चुकीच्या पद्धतीने हा प्रकल्प उभारण्याचा प्रयत्न केला. पावसाळ्यात पाण्याचा पूर आला होता. तो देखील सत्ताधारी आणि प्रशासनाला दाखविला. तरी, सुद्धा काम केले जात होते. रिव्हर रेसिडेन्सीचा त्याला विरोध होता. परंतु, सत्ताधारी आणि प्रशासनाने नागरिकांच्या मुंडक्यावर पाय देऊन काम करण्याचा प्रयत्न केला. हरित लवादाने त्यांना मोठी चपराक दिली आहे. लवादाने जनतेला आणि आम्हाला न्याय दिला.सहशहर अभियंता मकरंद निकम म्हणाले, महापालिकेच्या वतीने चिखलीतील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प निळ्या पूररेषेत येत असल्याने हरित लवादाने पाडण्याचे आदेश दिले आहेत.  प्रकल्पाचे काम केवळ पाच टक्के झाले होते. लवादाच्या आदेशानुसार हे बांधकाम पाडण्यात येईल. यापुढे तिथे कोणतेही काम केले जाणार नाही.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडenvironmentपर्यावरणpollutionप्रदूषणriverनदी