शहरं
Join us  
Trending Stories
1
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
3
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
4
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
5
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
6
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
7
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
8
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
9
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
10
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
11
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
12
रात्रीत सर्व संपलं...उरला फक्त चपलांचा खच; स्मशानशांतता अन् बाजारातून कलिंगड गायब
13
ड्रेनेजच्या सफाईमुळे हत्याकांडाचा उलगडा! ३ महिन्यांपूर्वी बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ अटकेत
14
‘सुपर एल निनो’च्या उंबरठ्यावर! १५० वर्षांपूर्वीसारखी महाप्रलयंकारी स्थिती निर्माण होण्याची भीती
15
‘अटक ते कटक’ नकाशावरून महाराष्ट्रात संताप का?; मराठा साम्राज्याचा नकाशाच केला गायब
16
देशाबाहेर जाणारा पैसा अडविण्याची हिंमत हवी! हा भारताच्या स्वयंनिर्भरतेच्या आत्म्यावरच आघात
17
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
18
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
19
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
20
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
Daily Top 2Weekly Top 5

संघटनात्मक निवडीत राष्ट्रवादीत गटबाजी ?

By admin | Updated: April 4, 2015 06:01 IST

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहरातील विधानसभा मतदारसंघनिहाय संघटनात्मक निवडणुका रविवारी होणार आहेत. मात्र, शहराध्यक्ष पदासाठी

पुणे : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहरातील विधानसभा मतदारसंघनिहाय संघटनात्मक निवडणुका रविवारी होणार आहेत. मात्र, शहराध्यक्ष पदासाठी इच्छुक पदाधिकाऱ्यांनी आपल्या समर्थकांची वर्णी लावण्यासाठी फिल्डिंग लावली असून, त्यामुळे निवडीत गटबाजी होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष व खासदार अ‍ॅड. वंदना चव्हाण यांना सलग सहा वर्षे संधी मिळाली आहे. राज्यसभा खासदारपदी निवड झाल्यानंतर, त्यांनी पदमुक्त होण्याची इच्छा पक्षश्रेष्ठींकडे बोलून दाखविली होती. परंतु, संघटनात्मक निवडीच्या प्रक्रियेनंतर शहराध्यक्ष निवड होणार आहे. त्यासाठी प्रवक्ते अंकुश काकडे, आमदार अनिल भोसले, सभागृहनेते सुभाष जगताप, माजी महापौर राजलक्ष्मी भोसले, कार्याध्यक्ष श्रीकांत पाटील व नगरसेवक अप्पा रेणुसे यांची नावे चर्चेत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या शहरातील आठही मतदार संघांच्या अध्यक्षपदाच्या निवडीत समर्थकांची वर्णी लावण्यासाठी इच्छुकांची तयारी सुरू आहे. प्रत्येक मतदार संघात वेगवेगळ्या गटाचे समर्थक आमने-सामने येणार असल्याने गटबाजी होण्याची शक्यता आहे. मुंबईचे हरिश सणस हे प्रमुख निवडणूक निरीक्षक असून, मतदार संघनिहाय वेगळ्या निरीक्षकांची नियुक्ती केली आहे.