शहरं
Join us  
Trending Stories
1
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
2
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
3
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
4
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
5
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
6
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
7
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
8
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
9
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
10
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
11
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
12
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
13
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
14
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
15
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
16
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
17
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
18
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
19
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
20
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!

नसरापुरातील बनेश्वर मंदिर दिपोत्सवाने उजळले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2021 3:03 PM

श्री बनेश्वर येथे त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त विविधरंगी आकर्षक विविध रंगी फुलांची आरास करण्यात आली ...

नसरापुर (पुणे): पर्यटकांचे महाबळेश्वर व भाविकांचे श्रद्धा स्थान श्री बनेश्वर येथे त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त विविधरंगी आकर्षक विविध रंगी फुलांची आरास करण्यात आली तर मंदिराबाहेर विद्युत रोषणाई करून लक्ष लक्ष दिव्यांचा दीपोत्सव करण्यात आला. त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त नसरापूर (ता.भोर) येथील श्री बनेश्वर मंदिरातील या शिवालयात विविध रंगांच्या फुलांची नयनरम्य सजावट मंदिराचे सुधीर साळुंखे  यांनी कल्पकतेने केली.

पवित्र श्री बनेश्वर महाराजांच्या शिवलिंगाभोवती विविध रंगांच्या फुलांच्या पाकळ्याचा वापर करण्यात आला. श्री बनेश्वर महादेव शिवलिंगाभोवतीच्या प्रशस्त गाभार्‍यात फुलांची आरास करणे तसेच जिकिरीचे असते. शिवलिंगावर व शिवलिंग भोवती गाभार्‍यात मंदिराचे गुरव रवींद्र व अतुल हरगुडकर आरास करण्याकरीत मदत केली.

या आकर्षक सजावटीबरोबरच श्री बनेश्वर मंदिर लक्ष लक्ष दिव्यांनी दिव्यांनी उजळून निघालेले होते. यावेळी पूर्ण मंदिरात पणात्या लावल्या त्याबरोबरच मंदिरातील तळ्यांमध्ये पणत्या भाविकांचे लक्ष वेधून घेत होते. लक्ष लक्ष दिव्यांचा हा दीपोत्सव म्हणजे जणू स्वर्गच पृथ्वीवर उतरला की काय असे क्षणभर वाटायला लागत होते. लाखो दिव्यांनी उजळलेले मंदिर पाहून नागरिकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.

यावेळी श्री बनेश्वर महादेव देवस्थान ट्रस्टतर्फे मंदिरावर आकर्षक विविधरंगी विद्युत रोषणाई केली होती. यावेळी विश्वस्थ हनुमंत कदम, सुनंदा हरगुडकर, ग्रामस्थ दत्ताभाऊ वाल्हेकर, नंदलाल काजळे, अनिल शेटे, नवनाथ शिर्के, वन विभागाचे कदम श्रीकृष्ण आदींनी व्यवस्था पाहिली. त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त श्री बनेश्वर मंदिराबाहेरील प्रांगणाच्या बाहेर फटाक्यांची आतषबाजी करून बालगोपाळांनी दीपोत्सव साजरा केला.

टॅग्स :PuneपुणेTempleमंदिरspiritualअध्यात्मिक