पुणे रेल्वे स्टेशनला महात्मा फुलेंचे नाव द्या;महात्मा फुले मंडळ ट्रस्टची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 11:11 IST2025-07-03T11:11:02+5:302025-07-03T11:11:44+5:30

महात्मा जोतिराव फुले यांचे कार्य अविस्मरणीय आहे. खडकवासला धरण, कात्रज बोगदा, बंड गार्डन पूल, पुण्यात मुलींची पहिली शाळा तसेच वंचितांसाठी त्यांचे योगदान मोठे आहे.

Name Pune railway station after Mahatma Phule; Mahatma Phule Mandal Trust demands | पुणे रेल्वे स्टेशनला महात्मा फुलेंचे नाव द्या;महात्मा फुले मंडळ ट्रस्टची मागणी

पुणे रेल्वे स्टेशनला महात्मा फुलेंचे नाव द्या;महात्मा फुले मंडळ ट्रस्टची मागणी

पुणे :पुणे रेल्वे स्टेशनला क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी महात्मा फुले मंडळ ट्रस्टच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन पंतप्रधान, रेल्वेमंत्री तसेच रेल्वे मंत्रालय यांना पाठवण्यात आले आहे.

महात्मा जोतिराव फुले यांचे कार्य अविस्मरणीय आहे. खडकवासला धरण, कात्रज बोगदा, बंड गार्डन पूल, पुण्यात मुलींची पहिली शाळा तसेच वंचितांसाठी त्यांचे योगदान मोठे आहे.

त्यामुळे पुणे रेल्वे स्टेशनला महात्मा जोतिराव फुले यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी महात्मा फुले मंडळ ट्रस्टचे कार्यकारिणी अध्यक्ष मधुकर राऊत, हनुमंत टिळेकर, गोरक्ष जगताप, रमाकांत दरवडे, प्रा. चांगदेव पिंगळे, ॲड. दिगंबर आलाट, विजय कोठावळे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

Web Title: Name Pune railway station after Mahatma Phule; Mahatma Phule Mandal Trust demands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.