शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

नोटाबंदीचा फटका आजीबार्इंना

By admin | Updated: May 9, 2017 03:53 IST

केंद्र सरकारने गतवर्षी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी रात्री ८ वाजता देशात नोटाबंदी जाहीर झाली. त्यानंतर चलनातून जुन्या ५०० व १,००० रुपयांच्या नोटा पूर्णत:

लोकमत न्यूज नेटवर्ककिवळे : केंद्र सरकारने गतवर्षी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी रात्री ८ वाजता देशात नोटाबंदी जाहीर झाली. त्यानंतर चलनातून जुन्या ५०० व १,००० रुपयांच्या नोटा पूर्णत: बाद करण्यात आल्या. या घटनेला सोमवारी सहा महिने पूर्ण झाले. नोटबंदीच्या काळात देहूरोड, किवळे व रावेत भागातील काही वृद्ध आजीबाईंनी त्यांच्या बटव्यात व साडीच्या पिरवटात साठविलेल्या काही जुन्या नोटा मुलांना, नातवांना बदलून आणण्यासाठी दिल्या खऱ्या; मात्र सहा महिने उलटूनही या नोटा परत आजीबाईंना मिळाल्या नसल्याचा प्रकार समोर येत असल्याने अशा ‘हुशार’ मुलांच्या व नातवांच्या कर्तृत्वाची परिसरात चर्चा होऊ लागली आहे. अनेक अशिक्षित ज्येष्ठांना अशा पद्धतीने गंडविल्याच्या घटना झाल्याचेही बोलले जाते. नोटाबंदीच्या काळात सुरुवातीला ५० दिवस जुन्या नोटा बदलून देण्यात येत होत्या. बँक खात्यात जमा करण्याची मुभा देण्यात आली होती. देहूरोड, किवळे व रावेत भागातील विविध घरांतील आजीबाईंनी त्यांना नातेवाइकांकडून, तसेच निवृत्तिवेतनातून शिल्लक राहिलेल्या पैशांत हजार व पाचशेच्या जुन्या नोटा होत्या. त्या नोटा बटव्यात, तसेच साडीच्या पिरवटात साठवून ठेवल्या होत्या. काही आजीबाईंचे वय झाल्यामुळे व लिहिता-वाचता येत नसल्याने जुन्या नोटा बंदची चर्चा ऐकून त्यांनी साठविलेले सर्व पैसे कारभारी मुलाकडे किंवा कारभाऱ्याच्या मुलाकडे म्हणजे नातवाकडे बदलून आणण्यासाठी दिले. हे पैसे स्वत:च्या खात्यावर भरून बदलून घेतले असताना आजीबाईंनी सध्या लग्नसराई असल्याने नात्यातील लग्नात काही खर्च करण्यासाठी, ये-जा करण्यासाठी मागितले असता, संबंधित मुले व नातू असे पैसे देण्यास टाळाटाळ करत तुला पैसे कशाला हवेत, असे उलट प्रश्न विचारत असल्याची माहिती मिळाली आहे.