शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
6
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
7
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
8
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
9
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
10
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
11
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
12
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
14
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
15
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
16
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
17
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
18
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
19
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
20
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

माझ्या मुलाला न्याय हवा; राहुल फटांगडेच्या अाईचे भावनिक उद्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 4:59 PM

संभाजी भिडे यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यात यावेत यामागणीसाठी भिडेंच्या सन्मान माेर्चाचे अायाेजन करण्यात अाले हाेते. माेर्चाला पाेलीसांनी परवानगी नाकारल्यामुळे अाेंकारेश्वर मंदिराजवळ नदीपात्रात ठिय्या अांदाेलन करण्यात अाले.

ठळक मुद्देसंभाजी भिडे यांच्यावरील गुन्हे मागे घेण्याची करण्यात अाली मागणीनदीपात्रात करण्यात अाले ठिय्या अांदाेलन

पुणे : माझ्या मुलाच्या मारेकरांना पकडून त्यांना शिक्षा करायला हवी. माझ्या मुलाला न्याय हा मिळालाच पाहीजे अशी मागणी काेरेगांव-भीमा येथील दंगलीत मारला गेलेल्या राहुल फटांगडे याची अाई जनाबाई फटांगडे यांनी केली.     काेरेगाव-भीमा येथे दंगल भडकवल्याच्या अाराेपाखाली संभाजी भिडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. त्यांच्या अटकेसाठी भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष डाॅ. प्रकाश अांबेडकर यांनी साेमवारी मुंबईत एल्गार माेर्चाचे अायाेजन केले हाेते. भिडेंच्या समर्थनार्थ पुण्यात श्रीशिवप्रतिष्ठानच्या वतीने  ठिय्या अांदाेलन करण्यात अाले हाेते. त्यावेळ जनाबाई फटांगडे बाेलत हाेत्या.     संभाजी भिडे यांच्यावरील दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत, मिलिंद एकबोटे, धनंजय देसाई यांची खोट्या आरोपातून मुक्तता करावी, पुण्यातील एल्गार परिषदेतील सर्व जातीयवादी वक्त्यांवर कारवाई करावी, कोरेगाव-भीमा हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्या राहुल फटांगळेला न्याय मिळावा, 3 जानेवारी 2018 ला करण्यात आलेल्या महाराष्ट्र बंददरम्यान झालेल्या नुकसानाची भरपाई बंद पुकारणाऱ्यांकडूनच वसूल करावी अादी मागण्यांसाठी राज्यासह पुण्यातही भिडेंच्या सन्मान माेर्चाचे अायाेजन करण्यात अाले हाेते. मात्र पाेलीसांनी माेर्चाला परवानगी नाकारल्याने अाेंकारेश्वर जवळील नदी पात्रात ठिय्या अांदाेलन करण्यात अाले. यावेळी शेकडाे कार्यकर्ते सामिल झाले हाेते. हातात भगवा घ्वज अाणि विविध मागण्यांचे फलक धरण्यात अाले हाेते. अांदाेलकांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत अापल्या मागण्यांचे निवेदन दिले. त्यानंतर निवेदनाचे जाहीर वाचन करुन अांदाेलनाची सांगता करण्यात आली.     यावेळी बाेलताना श्रीशिवप्रतिष्ठानचे पुणे महानगर कार्यवाह प्रा.पराशर मोने म्हणाले, दिनांक १ जानेवारी रोजी कोरेगाव भीमा प्रकरणात संभाजी भिडे गुरूजी यांचे नाव विनाकारण गोवले जात आहे. राष्ट्रीय ऐक्य अबाधित राहण्याच्या दृष्टीने ही अतिशय गंभीर गोष्ट आहे. मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत संभाजी भिडे गुरुजी निर्दोष असल्याचे मान्य केले. मुळात दोन महिने आधीच त्यांनी हे बोलायला हवे होते. परंतु ते आता बोलले याबाबत त्यांचे स्वागतच आहे. ज्यांनी खोटी साक्ष दिली त्यांची कसून चौकशी व्हायला हवी.     या अांदाेलनावेळी माजी खासदार प्रदीप रावत, नगरसेविका ज्योत्स्ना एकबोटे, नंदकिशोर एकबोटे, जिल्हाप्रमुख संजय जढर, मुकुंद मासाळ, संजय पासलकर, अविनाश मरकळे, ओंकार लांडगे, संतोष गोपाळ, रमेश कोंडे, नगरसेवक धीरज घाटे, गणेश जगताप, आदित्य मांजरे आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Sambhaji Bhideसंभाजी भिडे गुरुजीMilind Ekboteमिलिंद एकबोटेPuneपुणेBhima-koregaonभीमा-कोरेगाव