Pune: दारूला पैसे न दिल्याने डोक्यात सिमेंटचा गट्टू घालून खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 09:34 IST2025-01-06T09:34:05+5:302025-01-06T09:34:22+5:30

दोघे दारू पिट असताना तिसरा तेथे येऊन दारूचे पैसे मागत होता

Murdered by putting a cement block on the head for not paying for alcohol | Pune: दारूला पैसे न दिल्याने डोक्यात सिमेंटचा गट्टू घालून खून

Pune: दारूला पैसे न दिल्याने डोक्यात सिमेंटचा गट्टू घालून खून

पुणे : दारू पिण्यास पैसे न दिल्याने एकाच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू घालून खून करण्यात आल्याची घटना लोणी काळभोर परिसरात घडली. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली.

योगेश लक्ष्मण काळभोर (वय ४५, रा.लाेणी काळभोर, पुणे-सोलापूर रस्ता) असे खून झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी नंदू उर्फ पोपट लक्ष्मण म्हात्रे (वय ३९, रा.लोणी काळभोर, पुणे-सोलापूर रस्ता) याला अटक करण्यात आली. याबाबत पोलिस शिपाई केतन उत्तम धेंडे यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या महिन्यात १५ डिसेंबर रोजी योगेश आणि सोमनाथ जाधव हे लोणी काळभोरमधील रायवाडी भागात असलेल्या दत्तात्रय कांबळे यांच्या खोलीत दारू पित होते. त्यावेळी आरोपी नंदू तेथे आला. त्याने योगेशला शिवीगाळ केली. दारू पिण्यास पैसे का दिले नाही, अशी विचारणा करुन त्याला धक्काबुक्की केली. झटापटीत त्याने योगेश यांच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू मारला. उपचाराच्या दरम्यान योगेशचा मृत्यू झाला. सुरुवातीला या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती.

त्यानंतर, पोलिसांनी तपास सुरू केला. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार सोमनाथ जाधव याच्यासह चौघांकडे चौकशी करण्यात आली. चौकशीत आरोपीने दारू पिण्यास पैसे न दिल्याने योगेश याच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू मारून खून केल्याचे उघड झाले. आरोपी नंदू म्हात्रेला अट करण्यात आली असून, पोलिस उपनिरीक्षक रत्नदीप बिराजदार तपास करीत आहेत.

Web Title: Murdered by putting a cement block on the head for not paying for alcohol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.