डोक्यात दगड आणि विटा घालून केला तरुणाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 16:35 IST2021-05-19T16:35:30+5:302021-05-19T16:35:36+5:30

कात्रज येथील मांगडेवाडीमध्ये घडली ही घटना, आरोपी अजूनही फरार

Murder of a young man with stones and bricks in his head | डोक्यात दगड आणि विटा घालून केला तरुणाचा खून

डोक्यात दगड आणि विटा घालून केला तरुणाचा खून

ठळक मुद्देखून झालेली व्यक्ती घराशेजारी असलेल्या एका अर्धवट बांधकाम झालेल्या इमारतीत परिचीत व्यक्तीसमवेत दारु प्यायला बसली होती

धनकवडी : शहरातील लॉक डाऊन असतानाही खूनाच्या घटना घडत आहेत. बिबवेवाडी मध्ये मध्यरात्री झालेल्या खूनानंतर मंगळवारी रात्री भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणाचा डोक्‍यात दगड व वीटा घालून खून करण्यात आला. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कात्रज येथील मांगडेवाडीमध्ये ही घटना घडली आहे.

मोहन संपत चौंडकर (वय ३२, रा. मांगडेवाडी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास त्याच्या डोक्‍यात विटा आणि दगड घालून खून करण्यात आला आहे. मध्यरात्री हा प्रकार समोर आल्यानंतर घटनास्थळी भारती विद्यापीठ पोलिसांनी धाव घेतली. त्यानंतर मृतदेह ससून रुग्णालयात नेण्यात आला. संशयित एकाची माहिती मिळाली आहे, असे सांगण्यात येत आहे. मात्र हा खून का झाला आणि तो कोणी केला हे समजू शकलेले नाही. मोहन हा नऱ्हे येथील एका कंपनीत काम करत होता. घटनास्थळी पोलीस उपायुक्त सागर पाटील, सहायक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी भेट दिली.

चौंडकर हा घराशेजारी असलेल्या एका अर्धवट बांधकाम झालेल्या इमारतीत परिचीत व्यक्तीसमवेत दारु पित बसला होता. बराच वेळा होऊनही तो घरी न परत ल्याने त्याच्या घरच्यांनी तेथे धाव घेतली. तेव्हा तो रक्ता च्या थारोळ्यात पडलेला आढळला.

Web Title: Murder of a young man with stones and bricks in his head