Pune Crime: दीड हजार रुपये परत न दिल्याने तरुणाचा दगडाने ठेचून खून; पुण्यातील धक्कादायक घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2022 16:02 IST2022-03-17T16:02:03+5:302022-03-17T16:02:17+5:30
पुणे : मोबाईल देण्याच्या बदल्यात दीड हजार रुपये घेऊन मोबाईल किंवा घेतलेले पैसे न दिल्याच्या कारणावरून एका तरुणाच्या डोक्यात ...

Pune Crime: दीड हजार रुपये परत न दिल्याने तरुणाचा दगडाने ठेचून खून; पुण्यातील धक्कादायक घटना
पुणे : मोबाईल देण्याच्या बदल्यात दीड हजार रुपये घेऊन मोबाईल किंवा घेतलेले पैसे न दिल्याच्या कारणावरून एका तरुणाच्या डोक्यात व चेहऱ्यावर दगडाने ठेचून खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी एकाला अटक केली आहे.
अब्दुल्ला इलियास सरदार ऊर्फ बबलू (वय ३६, रा. जुना वाडा, बुधवार पेठ, मुळ रा. पश्चिम बंगाल) असे अटक केलेल्याचे नाव आहे. इस्माईल ऊर्फ सद्दाम काशिद अली शेख (वय २९, रा. शुक्रवार पेठ) असे खून झालेल्याचे नाव आहे. ही घटना डेंगळे पुलाखाली नदीपात्रात मंगळवारी सकाळी पावणेनऊ पूर्वी घडली होती. याप्रकरणी मुरीय इस्माईल शेख (वय २५, रा. शुक्रवार पेठ) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इस्माईल आणि अब्दुल्ला हे दोघेही मजूर म्हणून काम करत होते. इस्माईल याने अब्दुल्ला याच्याकडून मोबाईल देण्याच्या बदल्यात दीड हजार रुपये घेतले होते. मात्र, त्याला मोबाईल दिला नव्हता. तसेच घेतलेले पैसे दिले नव्हते. त्यावरून दोघांमध्ये वाद झाले होते. डेंगळे पुलाखाली नदीपात्रात मंगळवारी सकाळी इस्माईल शेख याचा मृतदेह आढळून आला. त्याच्या डोक्यावर व चेहऱ्यावर दगडाने ठेचून खून केला होता. पोलिसांनी चौकशी केल्यावर या दोघांमधील वादाची माहिती मिळाली. त्यावरून पोलिसांनी अब्दुल्ला सरदार याला अटक केली आहे.