कार घासल्याने नुकसान भरपाई मागण्यासाठी आलेल्या तरुणाचा निर्घुण खून

By विवेक भुसे | Published: December 13, 2023 11:08 AM2023-12-13T11:08:29+5:302023-12-13T11:09:01+5:30

नुकसान भरपाई घेण्यासाठी तरुण गेला असताना ७ ते ८ जणांनी त्याच्या तोंडावर, डोक्यावर धारदार शस्त्राने वार करुन खून केला

Murder of a young man who came to seek compensation for rubbing a car | कार घासल्याने नुकसान भरपाई मागण्यासाठी आलेल्या तरुणाचा निर्घुण खून

कार घासल्याने नुकसान भरपाई मागण्यासाठी आलेल्या तरुणाचा निर्घुण खून

पुणे : रस्त्याने जाताना कारला दुसरी गाडी घासल्याने वादावादी झाली. त्यानंतर नुकसान भरपाई मागण्यासाठी आलेल्या तरुणाला ७ ते ८ जणांनी धारदार शस्त्राने मारहाण करुन त्याचा निर्घुण खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. अभिषेक संजय भोसले (वय ३०, रा. शेवाळवाडी, हडपसर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

याबाबत अभिषेक यांचा भाचा अथर्व दादासाहेब साबळे (वय १८,रा. शेवाळवाडी)यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी विलास सकट (वय ३१, रा. चंदवाडी, फुरसुंगी) याच्यासह ७ ते ८ जणांवर  खूनाचा गुन्हा दाखल केला असून एकाला ताब्यात घेतले आहे. हा प्रकार फुरसुंगीतील चंदवाडी येथे मंगळवारी रात्री सव्वा दहा वाजता घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिषेक भोसले हे फर्निचरचे काम करतात़ ते स्विफ्ट गाडी घेऊन मंगळवारी सायंकाळी सहा वाजता शेवाळवाडी येथील महादेव मंदिराजवळून जात होते. त्यावेळी दुसरी गाडी येऊन त्यांच्या कारला घासली. यावरुन विलास सकट याच्याशी त्यांची वादावादी झाली. त्यांनी नुकसान भरपाईची मागणी केली. नुकसान भरपाई घेण्यासाठी अभिषेक भोसले हे चंदवाडी येथे गेले असताना विकास सकट व इतर ७ ते ८ जणांनी त्यांच्या तोंडावर, डोक्यावर धारदार शस्त्राने वार करुन त्यांचा खून केला. याची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी एकाला ताब्यात घेतले असून आरोपींच्या शोधासाठी २ पथके रवाना झाली आहेत.

Web Title: Murder of a young man who came to seek compensation for rubbing a car

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.