Pune Crime: दारुच्या पैशांवरुन तरुणाच्या डोक्यात फरशी मारुन केला खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2021 14:39 IST2021-10-10T14:39:05+5:302021-10-10T14:39:15+5:30

पुण्याच्या लक्ष्मी रोडवरील गणेश पेठ पोलीस चौकीसमोरील पी एम टी बस स्टॉपच्या बाजूला हा शनिवारी पहाटे १ वाजता हा प्रकार घडला होता.

Murder by hitting the floor on the head of a young man with alcohol money | Pune Crime: दारुच्या पैशांवरुन तरुणाच्या डोक्यात फरशी मारुन केला खून

Pune Crime: दारुच्या पैशांवरुन तरुणाच्या डोक्यात फरशी मारुन केला खून

पुणे : दारुच्या पैशांवरुन झालेल्या भांडणात एकाने तरुणाच्या डोक्यात फरशी मारुन त्यांचा खून केला. लक्ष्मी रोडवरील गणेश पेठ पोलीस चौकीसमोरील पी एम टी बस स्टॉपच्या बाजूला हा शनिवारी पहाटे १ वाजता हा प्रकार घडला होता. याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

राजू निवृत्ती बोंद्रे (वय ४८, रा. सखारामनगर, थेऊर, ता. हवेली, सध्या गणेश पेठ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. सुरज अनंत कामथे (वय ३२, रा. गणेश पेठ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी सुरज याची बहीण स्नेहल आशिष काची (वय ३३, रा. शुक्रवार पेठ) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

कामथे याच्याविरोधात चोरीचे गुन्हे दाखल आहेत. त्याला दारु पिण्याचे व्यसन होते. दारुच्या पैशाच्या कारणावरुन राजू बोंद्रे आणि सुरज कामथे यांच्या भांडणे झाली. त्यामुळे राजू बोंद्रे याने सुरजच्या डोक्यात फरशी मारुन त्याला गंभीर जखमी केले. सुरज रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसल्यावर तो पळून गेला. शनिवारी पहाटे १ वाजण्याच्या सुमारास सुरज रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यांनी त्याला तातडीने रुग्णालयात नेले. परंतु, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यु झाला. पोलिसांनी राजू बोंद्रे याला अटक केली असून सहायक पोलीस निरीक्षक अभिजित पाटील अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Murder by hitting the floor on the head of a young man with alcohol money