पुण्यातील सराईत गुन्हेगाराचा फिल्मी स्टाईल खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2019 16:55 IST2019-05-02T16:53:28+5:302019-05-02T16:55:14+5:30

पुणे सातारा रस्त्यावरील नारायणपूर येथे भररस्त्यात पुण्यातील एका सराईत गुन्हेगाराचा खून करण्यात आला.

murder of criminal who has pla in sinhagad road police | पुण्यातील सराईत गुन्हेगाराचा फिल्मी स्टाईल खून

पुण्यातील सराईत गुन्हेगाराचा फिल्मी स्टाईल खून

पुणे : पुणे सातारा रस्त्यावरील नारायणपूर येथे भर रस्त्यात पुण्यातील एका सराईत गुन्हेगाराचा खून करण्यात आला. त्यामुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. हसन शेख असे खून करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव असून त्याचा पाठलाग करुन त्याच्यावर गाेळीबार करण्यात आला. 

हसन शेख हा सिंहगड राेड पाेलिसांच्या रेकाॅर्डवरील गुन्हेगार आहे. आज सकाळी शेख हा नारायणपूर येथून त्याच्या कारने जात असताना अज्ञात हल्लेखाेरांनी बाेलेराेने त्याच्या कारला धडक दिली. त्यांनतर त्यांच्यावर गाेळीबार केला. तसेच त्याला कारच्या बाहेर काढत त्याच्यावर काेयत्याने वार करण्यात आले. भररस्त्यात ही घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. हल्ला करुन हल्लेखाेर पसार झाले. हडपसर पाेलीस घटनास्थळी दाखल झाले असून ते पुढील तपास करत आहेत. 

शेख याच्यावर या आधी देखील 2015 मध्ये हाॅटेल राज गार्डन येथे हल्ला करण्यात आला हाेता. त्यावेळी देखील त्याच्यावर गाेळीबार करण्यात आला हाेता. त्यात ताे गंभीर जखमी झाल्याने ताे काहीकाळ काेमात गेला हाेता. त्यातून बरा झाल्यानंतर त्याने हाॅटेल व इतर व्यवसाय सुरु केले हाेते. पाेलिसांनी त्यावेळी त्याच्यावर हल्ला करणाऱ्यांना अटक केली हाेती. त्यानंतर आज पुन्हा तशाच पद्धतीने शेख याच्यावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला. 

Web Title: murder of criminal who has pla in sinhagad road police