शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
3
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
4
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
5
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
6
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
7
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
8
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
9
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
10
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
11
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
12
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
13
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
14
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
15
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
16
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
17
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
18
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
19
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
20
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेचे वॉर्डन आता बीआरटी मार्गावर

By admin | Updated: January 16, 2015 03:17 IST

महापालिकेच्या वतीने वाहतूक पोलिसांच्या मदतीसाठी त्यांना उपलब्ध करून देण्यात आलेले १४५ ट्रॅफिक वॉर्डन काढून घेण्याचे आदेश आयुक्त कुणाल कुमार यांनी सुरक्षा विभागाला दिले आहेत.

पुणे : महापालिकेच्या वतीने वाहतूक पोलिसांच्या मदतीसाठी त्यांना उपलब्ध करून देण्यात आलेले १४५ ट्रॅफिक वॉर्डन काढून घेण्याचे आदेश आयुक्त कुणाल कुमार यांनी सुरक्षा विभागाला दिले आहेत. बीआरटी मार्गावर खासगी वाहने शिरून अपघात होत असल्याने त्या ठिकाणी हे वॉर्डन तैनात करण्यात येणार आहेत. या आदेशाची कार्यवाही पूर्ण करण्यास एक महिन्याचा कालावधी लागणार असून, फेब्रुवारी महिन्यात याची अंमलबजावणी होणार आहे.शहरामध्ये वाहतुकीचा ताण वाढल्याने त्याचे नियमन करण्यासाठी वाहतूक पोलिसांच्या मदतीला मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची मागणी वाहतूक विभागाकडून महापालिकेकडे करण्यात आली होती. त्यानुसार जिल्हा सुरक्षा मंडळाच्या माध्यमातून वाहतूक विभागाशी करार करून त्यांना १४५ ट्रॅफिक वॉर्डन उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यांचा संपूर्ण पगार महापालिकेकडून देण्यात येत आहे. वाहतूक विभागाकडे पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध झाल्यानंतर त्यांनी महापालिकेला वॉर्डन परत करावेत अशी अट करारामध्ये घालण्यात आली होती. गेल्या काही दिवसांमध्ये वाहतूक विभागाकडील कर्मचाऱ्यांची संख्या वाढली आहे. हडपसर व सातारा रस्त्यावरील बीआरटी मार्गावर अपघातांची संख्या लक्षणीय आहे. त्याचबरोबर आता आळंदी रस्ता व नगर रोड येथील बीआरटी मार्ग मार्चअखेर पर्यंत कार्यान्वित करण्यात येणार आहेत. बीआरटी मार्गात खासगी वाहने शिरू नयेत याची दक्षता घेण्याची मोठी गरज आहे. त्यामुळे त्या ठिकाणी ट्रॅफिक वॉर्डन तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी वाहतूक विभागाकडील वॉर्डन काढून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (प्रतिनिधी)