महापालिका निवडणूक : काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी बोलावली पुण्यातील नेत्यांची बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 13:09 IST2025-06-17T13:08:56+5:302025-06-17T13:09:20+5:30

प्रदेशने नियुक्त केलेले पुणे शहराचे निरीक्षक माजी मंत्री सतेज पाटील हेही या बैठकीला उपस्थित असणार आहेत. त्यांनी आतापर्यंत दोन वेळा पुणे शहराचा दौरा करून याच पदाधिकाऱ्यांबरोबर वैयक्तिक चर्चाही केली आहे.

Municipal elections: Congress state president calls meeting of Pune leaders | महापालिका निवडणूक : काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी बोलावली पुण्यातील नेत्यांची बैठक

महापालिका निवडणूक : काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी बोलावली पुण्यातील नेत्यांची बैठक

पुणे : प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बुधवारी (दि. १८) पुण्यातील नेत्यांची मुंबईत बैठक बोलावली आहे. पक्षसंघटना तसेच महापालिका निवडणूक यावर बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे.

प्रदेशने नियुक्त केलेले पुणे शहराचे निरीक्षक माजी मंत्री सतेज पाटील हेही या बैठकीला उपस्थित असणार आहेत. त्यांनी आतापर्यंत दोन वेळा पुणे शहराचा दौरा करून याच पदाधिकाऱ्यांबरोबर वैयक्तिक चर्चाही केली आहे. त्यांची शहराबद्दलची निरीक्षणे ते बैठकीत मांडणार आहेत.

सर्व आजी-माजी खासदार, आमदार, मंत्री, नगरसेवक, पक्षाचे प्रदेश तसेच जिल्हा स्तरावर काम करणारे संघटनात्मक पदाधिकारी यांना बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आले आहे. मागील काही पंचवार्षिक निवडणुकांमध्ये पक्षाची कामगिरी सातत्याने खालावत गेली आहे. लोकसभेपासून ते महापालिकेपर्यंत पक्षाचा आलेख खालीखालीच आला आहे. संघटनेचे अस्तित्व राहिलेले नाही. पदाधिकारी, कार्यकर्ते एकतर पक्ष सोडून जात आहेत किंवा मग काम करण्याचेच थांबवत आहेत. या सर्व गोष्टींवर बैठकीत चर्चा होणार आहे.

Web Title: Municipal elections: Congress state president calls meeting of Pune leaders