शहरं
Join us  
Trending Stories
1
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
2
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
3
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
4
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
5
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
6
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
7
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
8
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
9
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
10
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
11
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
12
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
13
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
14
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
15
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
16
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
17
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
18
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
19
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
20
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या रिंगरोडसाठी महापालिका देणार हमीपत्र

By admin | Updated: September 24, 2015 03:15 IST

तब्बल २७ वर्षे रखडलेल्या शहरातील हाय कॅपॅसिटी मास ट्रॅन्झिस्ट रुट (एचसीएमटीआर) या प्रकल्पाच्या घोरपडी येथील ३०० मीटर क्षेत्रातील जागामालकांनी आपली जागा पालिकेला देण्याची तयारी दर्शवली आहे.

पुणे : तब्बल २७ वर्षे रखडलेल्या शहरातील हाय कॅपॅसिटी मास ट्रॅन्झिस्ट रुट (एचसीएमटीआर) या प्रकल्पाच्या घोरपडी येथील ३०० मीटर क्षेत्रातील जागामालकांनी आपली जागा पालिकेला देण्याची तयारी दर्शवली आहे. पालिकेत बुधवारी यासंदर्भात झालेल्या बैठकीला या क्षेत्रातील चारही जागामालक उपस्थित होते. उपमहापौर आबा बागूल यांच्या दालनात ही बैठक झाली. अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, उपायुक्त (विशेष) अनिल पवार, मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त सतीश कुलकर्णी, माजी उपमहापौर बंडू गायकवाड, नगरसेविका सुरेखा कवडे आदींच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत प्रकल्पाच्या आतापर्यंतच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयाने सध्या भूसंपादनाची कारवाई स्थगित ठेवल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात येत होते. मात्र, बागूल यांनी याबाबत जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी भूसंपादनाची कारवाई सुरूच असल्याची माहिती दिली. बागूल यांनी याबाबत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. प्रशासनाच्या अशा धोरणामुळेच अत्यंत महत्त्वाचा ठरणारा हा प्रकल्प रेंगाळला आहे, असे ते म्हणाले. या धोरणामुळे प्रकल्पाची मूळ किंमत वाढते व नंतर ती महापालिकेच्या आवाक्यात राहत नाही, त्यामुळे यापुढे अशी दिशाभूल करणारी माहिती देऊ नये, असे त्यांनी सांगितले. कशा स्वरूपात मोबदला हवा हे कळाल्यानंतर आयुक्त कुणाल कुमार यांच्याशी चर्चा करून तसे लेखी पत्र त्यांना देण्याची तयारी बकोरिया यांनी दर्शवली. बागूल यांनी याबाबतची कार्यवाही प्रशासनाकडून त्वरित होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली. ३०० मीटरचा हा प्रश्न लवकर मिटला, तर काम लगेचच सुरू करता येईल. रस्ता झाला तरीही कामाला गती येईल, असे ते म्हणाले.