मुंबई -पुणे रेल्वे मार्गावर दरड कोसळली : पुण्याकडे येणार्‍या रेल्वे थांबविल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2019 20:47 IST2019-07-08T20:40:00+5:302019-07-08T20:47:51+5:30

मुंबई पुणे लोहमार्गावर खंडाळा घाटातील मंक्की हिल याठिकाणी आज दुपारी तिन वाजण्याच्या सुमारास मोठी दरड पडल्याने मिडल व डाऊन लेन बंद झाल्याने पुण्याकडे येणार्‍या सर्व रेल्वे गाड्या थांबविण्यात आल्या आहेत. रेल्वे किमी 115 जवळ ही घटना घडली.

Mumbai-Pune railway line collapses: Railway coming to Pune has stopped | मुंबई -पुणे रेल्वे मार्गावर दरड कोसळली : पुण्याकडे येणार्‍या रेल्वे थांबविल्या

मुंबई -पुणे रेल्वे मार्गावर दरड कोसळली : पुण्याकडे येणार्‍या रेल्वे थांबविल्या

लोणावळा : मुंबई पुणे लोहमार्गावर खंडाळा घाटातील मंक्की हिल याठिकाणी आज दुपारी तिन वाजण्याच्या सुमारास मोठी दरड पडल्याने मिडल व डाऊन लेन बंद झाल्याने पुण्याकडे येणार्‍या सर्व रेल्वे गाड्या थांबविण्यात आल्या आहेत. रेल्वे किमी 115 जवळ ही घटना घडली.


     लोणावळा व खंडाळा परिसरात आज दुपारपासून जोराचा पाऊस सुरु आहे. पावसामुळे दुपारी दोनच्या सुमारास मंक्की हिलजवळ लहान स्वरुपाची दरड कोसळली. माती व दगड बाजुला करुन दोन गाड्या सोडल्यानंतर दुपारी तिन वाजण्याच्या सुमारास पुन्हा मोठ्या प्रमाणात दरड मिडल लाईनवर कोसळली, यावेळी काही दगड डाऊन लाईनवर गेल्याने या दोन्ही लेन वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आल्या आहेत. मार्गावर आलेले दगड मोठे असल्याने ते ब्लास्ट करुन फोडण्याचे काम सुरु असून तदनंतर रेल्वे सेवा सुरु होणार आहे. दरम्यान पुण्याकडे सर्व रेल्वे थांबविण्यात आल्या आहेत.

Web Title: Mumbai-Pune railway line collapses: Railway coming to Pune has stopped