Video: मुंबई-पुणे एक्स्प्रेस ठप्प..! मित्र कॅन्सर रुग्ण; ट्रॅफिकमुळे रुग्णालय..; प्रवाशाचा संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 12:06 IST2026-02-04T12:05:48+5:302026-02-04T12:06:45+5:30

Mumbai Pune Expressway Traffic Jam: या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून परिस्थितीची तीव्रता दिसून येत आहे.

Mumbai Pune Expressway Traffic Mumbai-Pune Express stuck..! Cancer patient left for his friend, got stuck in traffic; Passenger angry | Video: मुंबई-पुणे एक्स्प्रेस ठप्प..! मित्र कॅन्सर रुग्ण; ट्रॅफिकमुळे रुग्णालय..; प्रवाशाचा संताप

Video: मुंबई-पुणे एक्स्प्रेस ठप्प..! मित्र कॅन्सर रुग्ण; ट्रॅफिकमुळे रुग्णालय..; प्रवाशाचा संताप

पुणे - मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर काल संध्याकाळी रसायन वाहून नेणाऱ्या टँकरचा गंभीर अपघात झाल्याने महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. अपघातग्रस्त टँकरमधून ज्वालाग्राही वायूची गळती होत असल्याची माहिती मिळताच आपत्कालीन यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. संभाव्य धोका लक्षात घेऊन प्रशासनाने मुंबईकडे जाणारा मार्ग तात्पुरता बंद केला आहे.

मार्ग बंद केल्यामुळे एक्स्प्रेस वेच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून हजारो वाहनचालक अनेक तासांपासून अडकून पडले आहेत. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून परिस्थितीची तीव्रता दिसून येत आहे.

दरम्यान, वाहतूक कोंडीमुळे अनेक प्रवाशांचे नियोजित कार्यक्रम विस्कळीत झाले. लातूरहून रात्री १० वाजता मुंबईकडे निघालेल्या एका प्रवाशाने सांगितले की, “माझा मित्र कॅन्सर रुग्ण आहे. आम्हाला सकाळी १० वाजेपर्यंत मुंबईतील रुग्णालयात पोहोचायचे होते; मात्र ट्रॅफिक जाममुळे वेळेत पोहोचता आले नाही.”

 

बीडहून निघालेल्या दुसऱ्या प्रवाशानेही नाराजी व्यक्त करत सांगितले, “महत्त्वाच्या कामासाठी मुंबईला जात होतो; पण मार्ग बंद असल्याने पुढे जाता येत नाही. अनेक तास महामार्ग बंद आहे, तरी पर्यायी व्यवस्था दिसत नाही. प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष द्यावे.”

सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासन सतर्क असून गळती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. परिस्थिती सामान्य होईपर्यंत वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहनही करण्यात येत आहे. 

Web Title : मुंबई-पुणे एक्सप्रेसवे जाम: टैंकर दुर्घटना से यात्री फंसे, कैंसर मरीज की देरी।

Web Summary : मुंबई-पुणे एक्सप्रेसवे पर टैंकर दुर्घटना से भारी जाम लग गया। यात्री फंसे रहे, जिनमें एक कैंसर मरीज भी शामिल था जिसे तत्काल अस्पताल की देखभाल की आवश्यकता थी। अधिकारी स्थिति को हल करने के लिए काम कर रहे हैं, वैकल्पिक मार्गों की सलाह दे रहे हैं।

Web Title : Mumbai-Pune Expressway Gridlock: Tanker Accident Strands Passengers, Cancer Patient Delayed.

Web Summary : A tanker accident caused a massive traffic jam on the Mumbai-Pune Expressway. Passengers were stranded, including a cancer patient needing urgent hospital care. Authorities are working to resolve the situation, advising alternative routes.