मुंबई पोलीस दलातील कर्मचाऱ्याला पुण्यात अटक; लग्नाचे अमिष दाखवून २७ वर्षीय तरुणीवर केला होता बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2021 13:45 IST2021-07-07T13:40:58+5:302021-07-07T13:45:02+5:30

कर्मचारी मुंबई पोलीस दलात पोलीस शिपाई असून मुख्यालयात त्यांची नेमणूक आहे

Mumbai Police constable arrested in Pune; A 27-year-old girl was raped on the pretext of marriage | मुंबई पोलीस दलातील कर्मचाऱ्याला पुण्यात अटक; लग्नाचे अमिष दाखवून २७ वर्षीय तरुणीवर केला होता बलात्कार

मुंबई पोलीस दलातील कर्मचाऱ्याला पुण्यात अटक; लग्नाचे अमिष दाखवून २७ वर्षीय तरुणीवर केला होता बलात्कार

ठळक मुद्देतरुणीच्या आई वडिलांकडून अडीच लाखांची रोकड आणि अडीच तोळे सोने घेऊन ते परत न करता फसवणूक केली.

लोणी काळभोर: मुंबई पोलीस दलातील कर्मचाऱ्याने नात्यातील तरुणीवर लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केला होता. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी त्याला पुण्यातून अटक केली आहे. संदीप बळीराम वाघमारे (रा. वरळी) असे अटक केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. याबाबत लोणी काळभोर पोलीस ठाण्यात २७ वर्षीय तरुणीने तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप बळीराम हे मुंबई पोलीस दलात पोलीस शिपाई आहेत. मुख्यालयात त्यांची नेमणूक आहे. दरम्यान तरुणी ही नात्यातील असल्याने त्यांची ओळख झाली होती. यावेळी संदीप याने तरुणीला लग्नाचे आमिष दाखविले. त्यानंतर तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. गेल्या दीड वर्षांपासून हा प्रकार सुरू होता. तसेच त्याने तरुणीच्या आई वडिलांकडून अडीच लाखांची रोकड आणि अडीच तोळे सोने घेऊन ते परत न करता फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. लोणी काळभोर पोलीस तपास करत आहेत.

Web Title: Mumbai Police constable arrested in Pune; A 27-year-old girl was raped on the pretext of marriage