शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
2
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
3
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
4
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
5
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
6
अल्पवयीन मुलीवर गँगरेप, प्रेग्नेंट असल्याचं कळताच जिवंत गाडण्याचा प्रयत्न; २ अटक तर १ आरोपी फरार
7
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणूकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?
8
बनावट राजदूत मोठा मासा निघाला! दहा वर्षात १६२ वेळा परदेशात गेला, या मुस्लिम देशात बऱ्याच वेळा गेला
9
ना नुकसानीची भीती, ना पैसे बुडण्याची चिंता; 'या' स्कीममध्ये ₹१ लाख गुंतवून बनवू शकता २७ लाख रुपये
10
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
11
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान
12
"मेरे को बहुत तकलीफ दिया...", सोलापूरच्या युवकाची अखेरची चिठ्ठी; मृत्यूनंतर वेगळीच शंका
13
आजचे राशीभविष्य २६ जुलै २०२५: 'या' ३ राशीच्या लोकांसाठी लाभाचा दिवस, अपूर्ण कामे पूर्ण होतील
14
"म्हातारी झालीस, लग्न कधी करणार?"; चाहत्याने केली कमेंट, ३८ वर्षीय अभिनेत्री म्हणाली-
15
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
16
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
17
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
18
राज्यात ८०० कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, निधी गेला श्रीकांत शिंदेंच्या ट्रस्टकडे : खा. राऊत 
19
डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
20
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती

प्रो कबड्डी लीग स्पर्धेत मुंबई संघ बाद; फेरीत बंगाल वॉरियर्सवर मिळवला ३६-२७ असा विजय

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 20:59 IST

पुणे : प्रो कबड्डी लीग स्पर्धेत बाद फेरीत प्रवेश करण्याचा अखेरचा मान यु मुम्बा म्हणजेच मुंबई संघाने मिळविला. लीगच्या ...

पुणे : प्रो कबड्डी लीग स्पर्धेत बाद फेरीत प्रवेश करण्याचा अखेरचा मान यु मुम्बा म्हणजेच मुंबई संघाने मिळविला. लीगच्या ११व्या पर्वात मंगळवारी झालेल्या सामन्यात यु मुम्बाने बंगाल वॉरियर्सचा ३६-२७ असा पराभव केला. या विजयासह यु मुम्बाने गुणतालिकेत पाचव्या स्थानावर झेप घेतली. यु मुम्बा संघाने सातव्या पर्वानंतर प्रो कबड्डी लीगच्या बाद फेरीत प्रवेश केला. यु मुम्बा बाद फेरीत प्रवेश करणार हे निश्चित होती. यु मुम्बाने आज केवळ त्याची औपचारिकता पूर्ण केली. यु मुम्बाला बाद फेरी गाठण्यासाठी केवळ एक गुण आवश्यक होता.अखेरच्या दहा मिनिटांत बंगाल वॉरियर्सच्या बचावफळी आणि प्रणय राणेच्या चढाईने यु मुम्बाच्या संयमाची कसोटी पाहिली. अखेरच्या सत्रात एकवेळ बंगालने ११ गुणांचा सपाटा लावला. यु मुम्बा त्या वेळेस केवळ दोनच गुण मिळवू शकला होता. पण, तोवर वेळ संपत चालल्यामुळे यु मुम्बा संघाला सुटकेचा निश्वास टाकता आला. पूर्वार्धातच काहिशा संथ सुरुवातीनंतर यु मुम्बाने अजित चौहानच्या चढाया आणि सुनिल कुमारच्या बचावाने यु मुम्बाने हळू हळू सामन्यावर नियंत्रण मिळविले आणि नंतर वर्चस्व राखले. पूर्वार्धात एक लोण देत त्यांनी मध्यंतराचा १८-१० अशी मोठी आघाडी मिळवली.उत्तरार्धात फार वेगळे चित्र दिसले नाही. यु मुम्बाने सामन्यावरील नियंत्रण निसटणार नाही याची काळजी घेतली. उत्तरार्धात झफरदानेशच्या चढाया निर्णायक ठरल्या. सुनिल कुमार आणि परवेश बैन्सवाल या दुकडीचा बचाव या सत्रातही बघायला मिळाला. एकूणच यु मुम्बा संघाने नियंत्रणपूर्वक खेळताना विजयाची नोंद केली. बंगाल वॉरियर्सकडून केवळ प्रणय राणेला, नितेश राणेलाच छाप पाडता आली. चढाई आणि बचावातील त्यांची लढत बंगालसाठी निर्णय बदलू शकली नाही. नितेश कुमारने (८) हाय फाईव्ह पूर्ण केले, तर प्रणयने (१२) सुपर टेनची कामगिरी केली.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPro Kabaddi Leagueप्रो कबड्डी लीगKabaddiकबड्डी