मुळशी पुन्हा चर्चेत; एक कोटींची लाच घेताना तहसीलदार ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2018 20:33 IST2018-12-29T20:32:31+5:302018-12-29T20:33:38+5:30
गेल्याच महिन्यात आलेल्या मुळशी पॅटर्न चित्रपटामुळे मुळशी तालुका चर्चेत आलेला असताना आज आणखी एक खळबळजनक घटना समोर आली आहे.

मुळशी पुन्हा चर्चेत; एक कोटींची लाच घेताना तहसीलदार ताब्यात
पुणे : गेल्याच महिन्यात आलेल्या मुळशी पॅटर्न चित्रपटामुळे मुळशी तालुका चर्चेत आलेला असताना आज आणखी एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एका कडून तब्बल 1 कोटींची लाच मागणारा तहसिलदार सचिन डोंगरे यांना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने रंगेहाथ ताब्यात घेतले आहे.
तहसिलदार सचिन डोंगरे यांनी तक्रारदाराकडे 1 कोटींची लाच मागितली होती. यावर त्याने लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केली होती. यामुळे एसीबीने तक्रारदाराकडे एका बॅगमध्ये सुमारे 95 लाख रुपयांच्या नोटा देऊन डोंगरे याला देण्य़ासाठी पाठविले. तक्रारदाराकडून ही लाचेची रक्कम स्वीकारताना सचिन डोंगरे याला ताब्यात घेण्यात आले.