शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

चिखलसेतील बंधारा पावसाळ्यात कोरडा

By admin | Updated: August 15, 2014 00:55 IST

वन्यजीवांच्या पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून चिखलसे येथे वनविभागाने बांधलेला बंधारा ऐन पावसाळ्यात कोरडा ठणठणीत आहे.

वडगाव मावळ : वन्यजीवांच्या पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून चिखलसे येथे वनविभागाने बांधलेला बंधारा ऐन पावसाळ्यात कोरडा ठणठणीत आहे.चिखलसे वनक्षेत्रातील पशू-पक्षी उन्हाळ्यात अन्न व पिण्याच्या पाण्यासाठी लोकवस्तीकडे येतात. त्या वेळी त्यांना कुत्रे हल्ला करून मारत असल्याच्या घटना घडत होत्या. हे प्राणी वनक्षेत्राजवळीेल शेतीतील पिकांचे नुकसानही करीत होते. त्यामुळे वन्य पशू-पक्ष्यांच्या अन्न व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती. त्याचा विचार करून वनविभागाने वन्य पशू-पक्ष्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी मे २०१४ रोजी वनक्षेत्रात बंधारा बांधला. तो बंधारा ऐन पावसाळ्यात कोरडा आहे. गट नंबर २४४ मधील ८८ हेक्टर वनक्षेत्रात मोर, ससे, हरीण, कोल्हे, रानमांजर, रानडुकरे, रानकोंबड्यांचे वास्तव्य आहे. बंधाऱ्यांच्या बांधकामाबाबत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी माजी उपसरपंच बाळासाहेब काजळे, विजय काजळे, उपसरपंच नीलेश काजळे, सदस्य वंदना भांडे यांनी केली आहे.बाळासाहेब काजळे म्हणाले, ‘‘वनविभागाने हा बंधारा तयार करताना ग्रामस्थांना विश्वास न घेता चुकीच्या ठिकाणी बांधला आहे. पहिल्याच पावसात बंधाऱ्यात पाण्याचा टिपूसही नाही.’’ विजय काजळे म्हणाले, ‘‘हा बंधारा आणखी २०० मीटर पुढे बांधला असता, तर बंधाऱ्यात मार्च-एप्रिलपर्यंत पाणी साठा राहिला असता.’’ नीलेश काजळे म्हणाले, ‘‘बंधाऱ्याचा बांध जितका आहे तितका सुद्धा पाणीसाठा होणार नसल्याचे दिसत आहे.’’ (वार्ताहर)