लसींचे दोन डोस घेऊनही खासदार अमोल कोल्हेंना कोरोनाची लागण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2021 15:06 IST2021-08-20T15:06:01+5:302021-08-20T15:06:09+5:30

मतदारसंघातील पूर्वनियोजित दौरा सर्व कार्यक्रम पुढे ढकलले

MP Amol Kolhen contracted corona despite taking two doses of the vaccine | लसींचे दोन डोस घेऊनही खासदार अमोल कोल्हेंना कोरोनाची लागण

लसींचे दोन डोस घेऊनही खासदार अमोल कोल्हेंना कोरोनाची लागण

ठळक मुद्देसंपर्कात आलेल्या सर्वांना टेस्ट करून घेण्याचे आवाहन

पुणे : शिरूर मतदार संघाचे खासदार अमोल कोल्हे यांना लसींचे दोन डोस घेऊनही कोरोनची लग्न झाली आहे. ट्विटर वरून कोल्हे यांनी ही माहिती दिली. 

कोरोनाचे संकट अजूनही टळलेलं नाही. गेल्या दोन दिवसांपासून मला कोरोना सदृश लक्षणे दिसत आहेत. कोरोना प्रतिबंधक लसींचे दोनही डोस पूर्ण झाले आहेत. तरी टेस्ट केल्यानंतर माझा RT-PCR रिपोर्ट पाॅझिटिव्ह आला आहे. परंतु प्रकृती स्थिर असल्याचं ट्विट त्यांनी केलंय.

डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार वैद्यकीय उपचार सुरू केले आहेत. मतदारसंघातील पूर्वनियोजित दौरा सर्व कार्यक्रम पुढे ढकलले आहेत. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी लक्षणे आढळून आल्यास टेस्ट करून घ्यावी. असे आवाहनही त्यांनी केलंय. शक्यतो गर्दीची ठिकाणे टाळावीत. निर्धारीत नियमांचे काटेकोर पालन करावे. अशा सूचना कोल्हे यांनी ट्विटर वरून दिल्या आहेत. 

Web Title: MP Amol Kolhen contracted corona despite taking two doses of the vaccine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.