शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

एसटीची धडक बसून मोटार कोसळली दरीत

By admin | Updated: January 8, 2015 01:12 IST

१५० फुटांपर्यंत खोल दरीत गेलेल्या मोटारीतील सात जणांना अग्निशामक दलाचे कर्मचारी व पोलिसांनी बाहेर काढले.

पुणे : कात्रज घाटात उतारावरून येत असताना चालकाचे नियंत्रण सुटलेली एसटी बस समोरून येत असलेल्या मोटारीला धडकल्यामुळे ही मोटार थेट घाटातील दरीत कोसळली. १५० फुटांपर्यंत खोल दरीत गेलेल्या मोटारीतील सात जणांना अग्निशामक दलाचे कर्मचारी व पोलिसांनी बाहेर काढले. यामध्ये अवघ्या तीन महिन्यांच्या चिमुरड्याचाही समावेश होता. बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास झालेल्या या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. सुरेश रघुनाथ शेट्ये (वय ५०), सागर सुरेश शेट्ये (वय २७), आरती सागर शेट्ये (वय २४), आकाश विठ्ठल तांगडे (वय २०), अश्विनी नामदेव खेडेकर (वय २७), विराज खेडेकर (वय २), स्वराज शेट्ये (वय ३ महिने, सर्व रा. अरण्येश्वर) अशी जखमींची नावे आहेत. या सर्वांवर धनकवडीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी बसचालक मच्छिंद्र शंकर नरुटे (वय ३३) याला अटक करण्यात आली आहे. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एम. बी. चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, खासगी मोटरीमधून शेट्ये कुटुंबीय वाई येथे जात असताना कात्रज घाटात भोर-स्वारगेट मार्गावरील पुण्याच्या दिशेने एसटी बस (एमएच १२-ईएफ ६३४२) येत होती, त्या वेळी हा अपघात घडला. घटनास्थळी वरिष्ठ निरीक्षक एम. बी. चव्हाण आणि पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तातडीने दाखल झाले. अग्निशामक दलाचे जवानही घटनास्थळी पोहोचले. वाहतूक शाखेचे सहायक निरीक्षक के. एस. करे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. (प्रतिनिधी)वाहतूककोंडी आणि बघ्यांची गर्दी अग्निशामक दलाचे जवान, पोलीस अधिकारी व कर्मचारी दोरीच्या साह्याने दरीमध्ये उतरले. त्यांनी जखमींना तातडीने बाहेर काढून जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. अपघातामुळे घाटामध्ये वाहतूककोंडी आणि बघ्यांची गर्दी झाली होती.