आई फितूर; थोरल्या भावाचा खून करणाऱ्या लहान भावाला जन्मठेप, पत्नीची साक्ष ठरली महत्वाची

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2025 13:46 IST2025-05-03T13:45:46+5:302025-05-03T13:46:11+5:30

आईने केसदरम्यान सरकारी वकिलांना सहकार्य केले नाही, अशा परिस्थितीत आई ही कोणत्याही भरपाईला पात्र ठरत नसल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले

Mother's death Younger brother sentenced to life imprisonment for murdering elder brother wife testimony proved crucial | आई फितूर; थोरल्या भावाचा खून करणाऱ्या लहान भावाला जन्मठेप, पत्नीची साक्ष ठरली महत्वाची

आई फितूर; थोरल्या भावाचा खून करणाऱ्या लहान भावाला जन्मठेप, पत्नीची साक्ष ठरली महत्वाची

पुणे : मद्याचे व्यसन, कामधंदा न करता आई-वडिलांना त्रास देणाऱ्या लहान भावाला थोरल्या भावाचा खून केल्याप्रकरणी न्यायालयाने जन्मठेप व १ लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. पी. जाधव यांनी हा निकाल दिला. दंड न भरल्यास त्याला तीन महिने अतिरिक्त कारावास भोगावा लागणार असल्याचेही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. याबाबत आईनेच लोणी काळभोर पोलिसात फिर्याद दिली. मात्र, सुनावणीदरम्यान ती फितूर झाली. या केसमध्ये आरोपीच्या पत्नीची साक्ष महत्त्वाची ठरली.

आईने केसदरम्यान सरकारी वकिलांना सहकार्य केले नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत आई ही कोणत्याही भरपाईला पात्र ठरत नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले. नीलेश बबन बोरकर (वय ३१, रा. कोंडे वस्ती, उरळी देवाची) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. त्याने भाऊ मंगेश याचा खून केल्याप्रकरणी आईने लोणी काळभोर पोलिसात फिर्याद दिली होती. आरोपी नीलेशचा मंगेश हा मोठा भाऊ होता. तो काळेपडळ येथे राहत होता. घटनेच्या दिवशी उरळी कांचन येथे आला होता. त्यावेळी मंगेशला समजावून सांगताना दोघात वाद झाला. वाटण वाटायचा दगडी पाटा डोक्यात मारून नीलेशने मंगेशचा खून केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील नामदेव तरळगट्टी यांनी काम पाहिले. तर त्यांना न्यायालयीन कामकाजासाठी हवालदार ललिता कानवडे यांनी मदत केली. प्रत्यक्षदर्शी असलेल्या आरोपीच्या पत्नीचा साक्ष महत्त्वाची ठरली. घटनेनंतर आरोपीची पत्नी न मिळाल्याने तिची टिप्पणी नोंदविली नव्हती. मात्र, हवालदार कानवडे यांनी अथक प्रयत्नाद्वारे तिचा शोध घेतला. त्यानंतर न्यायालयीन प्रक्रियेद्वारे तिची साक्ष नोंदविण्यात आली. या खटल्यात तिची साक्ष महत्त्वाची ठरली. त्याप्रमाणे सरकारी वकील नामदेव तरळगट्टी फौज प्रकिया संहिता ३११ प्रमाणे अर्ज देऊन तिचा पुरावा नोंदविला. न्यायालयाने पत्नीची साक्ष ग्राह्य धरून आरोपीस जन्मठेपेची शिक्षा दिली.

Web Title: Mother's death Younger brother sentenced to life imprisonment for murdering elder brother wife testimony proved crucial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.