शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

आईच्या मायेने न्यायालयही जिंकले...

By admin | Updated: January 7, 2015 00:49 IST

मोठी जाऊ अपत्यहीन... तिच्या पदरात मूल देण्यासाठी लहान सुनेचा लग्नानंतर लगेचच गर्भधारणेसाठी छळ सुरू झाला... यथावकाश तिला मूलही झाले;

हिनाकौसर खान-पिंजार ल्ल पुणेमोठी जाऊ अपत्यहीन... तिच्या पदरात मूल देण्यासाठी लहान सुनेचा लग्नानंतर लगेचच गर्भधारणेसाठी छळ सुरू झाला... यथावकाश तिला मूलही झाले; पण मोठ्या जावेला आई करण्याच्या धांदलीत सासरच्यांनी बाळंतपणाच्या काही तासांतच तिचं जणू काळीजच ओरबाडलं... पहिल्या नाही तर दुसऱ्या बाळाशी तरी आपली नाळ तोडली जाणार नाहीं या आशेने तिने छळ सहन केला. दुसरी मुलगी झाली तर तिलाही हिसकावून किरकोळ निमित्त करून या मातेलाच घराबाहेर काढण्यात आले. आपल्या चिमुरड्यांनी ‘आई’ म्हणत बिलगावं, ही आस घेऊन ती ५ वर्षे न्यायालयात झुरत राहिली अन् अखेर न्यायालयाने तिच्या पदरात दोन्ही अपत्यांचं न्यायदान दिलं. पिंपरी परिसरात राहणारे पूजा व संदीप (नावे बदललेली) यांचे लग्न झाले, त्या वेळी पूजाच्या मोठ्या जावेला अपत्य नव्हते. ती आई होऊ शकणार नव्हती. त्यामुळे पूजाच्या लग्नानंतर लगेचच तिला मुलं व्हावे म्हणून तिला पती व सासऱ्याच्यांची त्रास देण्यास सुरुवात केली. तिला दिवस गेले. तिने मुलाला जन्म दिला आणि बाळंतपणाच्या काही तासांतचं तिचं मुलं मोठ्या जावेला देण्यात आलं. पती व इतर कुटुंबीयांनीही तिच्यावर दबाव आणला, की मूल मोठ्या जावेलाच द्यायचं व त्या बाळाला जवळ घ्यायचं नाही. तिच्या मातृत्वाचा जरासाही विचार न करता ते तिला बाळापासून दूर ठेवू लागले. त्यानंतर पुन्हा तिला दिवस गेले. हे बाळ तरी आपल्याला मिळेल, या आशेवर ती होती. दुसरी मुलगी झाली. सासऱ्यांनी तीही हिसकावून घेतली. एके दिवशी किरकोळ भांडणाचे कारण काढून तिला हाकलून लावले. माहेरची परिस्थिती हलाखीची; त्यामुळे तिला कोणताही आधार मिळेनासा झाला. उपजीविकेसाठी तिने एक इमारातीत साफसफाईचे काम सुरू केले. अखेर चेतना महिला विकास केंद्राच्या सहाय्याने न्यायालयीन लढा देत तिने आपली अपत्य मिळविली. ४ २००९ मध्ये ती कॅम्प येथील चेतना महिला विकास केंद्राकडे आली. त्यांच्या मदतीने तिने मुलांच्या ताबा मिळावा यासाठी त्यांच्यावर खटला दाखल केला. मात्र तेथेही सुरूवातीला संदीप व त्याच्या कुटुंबियांनी दाद दिली नाही.५ वर्ष ती आपल्या मुलांपासून दूर होती आणि एकटीनचे मुलांसाठी हा न्यायालयीन लढा देत होती. ४ अखेर तिच्या प्रयत्नांना यश आले आणि न्यायालयाने संदीपला वेगळी खोली घेऊन तिथे पूजा व मुलांना एकत्रित रहावे असा आदेश दिला. तसेच मुले ही दिवसा आईकडे राहतील व आजी आजोबा रात्रीच्या वेळेस त्यांच्याकडे राहू शकतील असेही आदेशात नमूद केले. अशी माहिती चेतना संस्थेच्या प्रमुख अ‍ॅड असुंता पारधे यांनी दिली.