खेड तालुक्यातील चिखलगाव येथे दोन लहान मुलींसह आईची विहिरीत उडी मारुन आत्मह्त्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2020 20:12 IST2020-04-17T20:11:58+5:302020-04-17T20:12:24+5:30
आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट

खेड तालुक्यातील चिखलगाव येथे दोन लहान मुलींसह आईची विहिरीत उडी मारुन आत्मह्त्या
राजगुरुनगर : चिखलगाव येथे (ता. खेड ) दोन लहान मुलीसह आईने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत हत्या की आत्महत्या यांचा तपास पोलिस करत आहेत.
सुरेखा उत्तम गोपाळे (वय३२ ) व तुप्ती उत्तम गोपाळे (वय ६ ) ज्ञानश्री उत्तम गोपाळे (वय ३ ) (रा. चिखलगाव ता खेड ) यांनी विहिरीत उडी मारून आत्महत्या केलेल्या मृतांची नावे आहेत. याप्रकरणी मृत महिलेचा पती उत्तम रघुनाभ गोपाळे (वय३८ रा. चिखलगाव, ता. खेड )याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सुरेखाचा भाऊ रामचंद्र काशिनाथ मोरे (रा. देवोशी ता. खेड ). यांने खेड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,उत्तम गोपाळे यांची पत्नी सुरेखा आपल्या दोन मुलींसह उन्हाळी बाजरीच्या शेतात पाणी देण्यास गेली होती. तसेच नवरा कृषी पंप चालू करण्यास गेला होता. दरम्यान सुरेखा व दोन लहाण मुलीचा मृतदेह विहिरीच्या पाण्यावर तरंगत असल्याचे स्थानिक ग्रामस्थांना दिसुन आले.. तात्काळ ही माहिती खेड पोलिस स्टेशनला कळवून पोलिस व ग्रामस्थांच्या मदतीने तिन्हीही मृतदेह विहिरीबाहेर काढण्यात आले. ते शवविच्छेदनासाठी चांडोली येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक अरविंद चौधरी करत आहे.