आईनेच ओढ्यात फेकले पोटच्या बाळाला! पुण्यातील धक्कादायक घटना; मात्र 'बाळ सुखरूप'
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2021 18:31 IST2021-08-24T18:30:43+5:302021-08-24T18:31:00+5:30
ओढात टाकणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल

आईनेच ओढ्यात फेकले पोटच्या बाळाला! पुण्यातील धक्कादायक घटना; मात्र 'बाळ सुखरूप'
सहकारनगर : अनैतिक संबंधातून झालेल्या बाळाची बदनामी टाळण्याकरिता जन्मदात्या आईनेच एक दिवसाच्या मुलाला ओढ्यात फेकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातल्या आंबील ओढ्यात टाकणाऱ्या बाळाला टाकणाऱ्या महिलेवर दत्तवाडी पोलीसांची कारवाई केली.
पोलीस उपनिरिक्षक स्वप्नील लोहार सहकाऱ्यांसोबत गस्त घालत असताना दांडेकर पूल आंबिल ओढा याभागात नागरिकांची गर्दी झाल्याचे समजले. घटनास्थळावरुन आंबिल ओढ्याच्या कडेला चिखलात एक दिवसाचे नवजात जिवंत बालक सापडले होते. त्यानंतर लगेचच ससून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
या घटनेचा तपास करताना पोलिसांनी परिसर पिंजुन काढला होता. तपासादरम्यान नागरिकांकडून माहिती मिळाली की अनैतिक संबंधातून एका महिलेने सदर बालकाला बदनामी टाळण्याकरीता जन्म देताच ओढ्याच्या कडेला सोडून दिल्याचे पोलिसांना समजले. याबाबत दत्तवाडी पोलीस ठाण्यामध्ये महिलेवर गुन्हा दाखल केला असुन पुढील कारवाई पोलीस उप - निरीक्षक रवींद्र कस्पटे हे करत आहेत.