शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

तिने नाही ; तिच्यातल्या 'आई'ने केले असे कृत्य की...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2019 15:53 IST

दुःखाच्या भरात उचलेले पाऊल महिलेले थेट तिला कारागृहात घेऊन गेले. पुण्यापासून सोलापूरपर्यंत पोचलेली ही हृदयस्पर्शी घटना आवर्जून वाचा

पुणे : कामासाठी पाच महिन्यांपूर्वी पुण्यात आली असताना चार ते पाच वर्षाची मुलगी तापाने आजारी पडून तिचे निधन झाले़.  मुलीच्या निधनाचे खोलवर परिणाम तिच्या आईवर झाला़. तिने आपली मुलगी गेली हे पतीलाही सांगितले नव्हते़.  लोहगाव येथे काम शोधण्यासाठी गेली असताना तिला एका ठिकाणी पाच वर्षाची मुलगी दिसली़.  आपल्या मुलीसारखीच ती असल्याचे वाटून तिने तिला आपल्याबरोबर घेतले़. इतरांच्या मदतीने त्या मुलीला घेऊन ती सोलापूरला गेली़. इतकेच नव्हे तर ही आपलीच मुलगी असल्याचे तिला पतीला सांगायचे होते़ परंतु, विमानतळ पोलिसांना पाच वर्षाची मुलगी हरविल्याची माहिती मिळताच त्यांनी शोध मोहीम सुरु केली व ती सोलापूरला पोहचण्यापूर्वीच तिला व तिला मदत करणाऱ्या अशा दोघांना ताब्यात घेऊन मुलीची सुखरुप सुटका केली़.  हिराबाई ऊर्फ बायडाबाई खंडाळे (वय ५५, रा़ कात्रज) आणि जयश्री शिवाजी कोळी (वय २३, रा़ खड्डा रघुजी ट्रान्सपोर्टजवळ, भवानी पेठ) अशी अटक केलेल्या महिलांची नावे आहेत़.  ही घटना लोहगाव मधील निंबाळकर नगर येथील लेबर कॅम्पमध्ये १६ नोव्हेंबरला घडली होती़. या प्रकरणी शिवाजी मुरलीधर चांदमाने (वय ३५, रा़ लेबर कॅम्प, प्राईड आशियाना सोसायटीसमोर, लोहगाव) यांनी विमानतळ पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़. याबाबत पोलिसांनी सांगितले की, जयश्री कोळी ही मुळची सोलापूरची राहणारी आहे़. ती जुलै महिन्यात पुण्यात कामासाठी आली होती़. या दरम्यान तिची चार पाच वर्षाची मुलगी तापाने आजारी पडली़ ससून रुग्णालयात उपचार सुरु असताना तिचे निधन झाले होते़.  याचा तिच्या मनावर खूप परिणाम झाला़ होता.  त्या हिराबाई खंडाळे यांच्याबरोबर १६ नोव्हेंबरला लोहगाव परिसरात कामाच्या शोधासाठी गेल्या होत्या़. हिराबाई पूर्वी या भागात रहात होत्या़. त्यांनी येथे जेवण केले़. त्यावेळी जयश्री हिला तेथे खेळत असलेली ५ वर्षाची अंजली दिसली़. तिला ती आपल्या मुलीसारखीच वाटली़.  त्यामुळे तिनेतिला बरोबर घेतले व त्या कात्रजला हिराबाईच्या घरी आल्या़.  इकडे अंजली दिसत नसल्याचे तिचा शोध सुरु झाला़,तेव्हा तिच्या लहान बहिणीने आपल्या इथे जेवायला आलेल्या बाईने दिदीला नेल्याचे सांगितले़.  त्यांनी तातडीने विमानतळ पोलिसांकडे संपर्क साधला़ विमानतळ पोलीसठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार यांनी सांगितले की, सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही गोष्ट आम्हाला समजली़.  आम्ही तातडीने सी- वॉचच्या माध्यमातून परिसरातील सीसीटीव्हीची तपासणी सुरु केली़.  लोहगाव, कलवडवस्ती येथील दोन सीसीटीव्हीमध्ये त्या दिसून आल्या़. त्या फोटोवरुन चौकशी सुरु केली़ तेव्हा हिराबाई खंडाळे यांना ओळखणाऱ्यांनी  त्या कात्रज येथे रहात असल्याचे सांगितले़ .पाठोपाठ पोलीस उपनिरीक्षक हणंमत गिरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी  कात्रज गाठले़. तेथे गेल्यावर ते सर्व जण सोलापूरला रेल्वेने रवाना झाल्याची माहिती मिळाली़. 

सोलापूरला पोहचण्यापूर्वीच पोलिसांचे एक पथक तेथे पोहचून त्यांनी दोघांना ताब्यात घेऊन मुलीची सुटका केली़.  याबाबत चौकशी केल्यावर जयश्री कोळी हिच्या मुलीचे निधन झाल्याचे व तिच्यावर ससून रुग्णालयात उपचार करण्यात होत होते़.  त्याबाबत अकस्मात मृत्यू अशी पोलिसांनी नोंद केली आहे़, असे पवार यांनी सांगितले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीKidnappingअपहरणDeathमृत्यूSolapurसोलापूर