जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 18:30 IST2025-12-26T18:29:57+5:302025-12-26T18:30:43+5:30
धार्मिक परंपरेच्या नावाखाली महिलेला विद्रुप करत असताना तिच्यावर एक कौंटुंबिक, मानसिक, सामाजिक दबाव टाकला जात असून तिचा जगण्याचा अधिकार हिरावून घेतला जातोय

जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
वासुंदे : रोटी (ता. दौंड) येथील ग्रामदैवत रोटमलनाथ मंदिरामध्ये पुर्वापार चालत आलेल्या शितोळे घराण्यातील मुलाच्या जावळाचा विधी करण्यासाठी रोटी येथील कुलदैवत श्री रोटमलनाथ व जोगेश्वरी मंदिरात येतात. हा शितोळे घराण्यातील मुलाच्या जावळाचा कार्यक्रम एखाद्या लग्नकार्याप्रमाणे केला जातो. यावेळी मामाच्या मांडीवर बसवून बोरल्या मुलाचे केस कापले जातात आणि मुलाच्या आईचेही केस अर्पण करण्याची शितोळे घराण्याची शेकडो वर्षांची परंपरा आहे.
मात्र याच वर्षानुवर्षे चालत आलेल्या जावळ काढण्याच्या परंपरेतील बाळाच्या आईचे केस काढण्याच्या प्रथेबाबत आईचे संक्तीने मुंडन केले जाते. याबाबत काही महिलांनी राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली. धार्मिक परंपरेच्या नावाखाली महिलेला विद्रुप करत असताना तिच्यावर एक कौंटुंबिक, मानसिक, सामाजिक दबाव टाकला जातो. खऱ्या अर्थाने तिच्या जगण्याचा अधिकार हिरावून घेतला जातो. या सर्वांचा दबाव तिच्यावर इतक्या मोठ्या प्रमाणात असतो की, तिला सक्तीने विद्रुप केले जाते. म्हणून राज्य महिला आयोगाच्या वतीने याची दखल घेत पुणे जिल्हाधिकारी यांना पत्रव्यवहार केला. याबाबत संबंधीत मंदिर प्रशासन आणि जे कोणी आमानवी प्रथा सुरु करुन महिलांना विद्रुप करत असतील. त्यांच्यावर अधि अनिष्ठ रुडी परंपरेच्या माध्यमातून त्यांच्या जगण्याचा आनंद अधिकार हिरावून घेत असतील. तर त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सुचना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिल्या आहेत.
संबंधितांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश - रुपाली चाकणकर
पुण्याच्या दौंडमधील श्री रोटमलनाथ मंदिरात मुलगा झाल्यानंतर आईचे सक्तीने मुंडन (जावळ काढणे) करण्याची अनिष्ट, अमानवीय प्रथा सुरू असल्याबाबत आयोगाकडे तक्रार करण्यात आली आहे. यातून धार्मिक परंपरेच्या नावाखाली महिलांना विद्रूप करत त्यांच्यावर मानसिक दबाव टाकण्यात येत आहे. अनेक महिला कौटुंबिक, सामाजिक दबावामुळे नाईलाजास्तव मुंडन करून घेत असून यामुळे महिल्यांच्या सन्मानाने जगण्याच्या अधिकारावर गदा आणली जात आहे. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने जिल्हाधिकारी पुणे यांना तात्काळ चौकशी करत अशा प्रथांना आळा घालण्यासाठी मंदिर प्रशासन आणि संबंधितांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
रुपाली चाकणकर यांनी शितोळे घराण्यातील जावळ काढण्याच्या परंपरेची पुरेशी माहिती न घेता घेतलेल्या भुमिकेचा व रुपाली चाकणकरांचा आम्ही शितोळे घराण्याच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करतो - शहाजी शितोळे, जेष्ठ ग्रामस्थ रोटी
तक्रारीची दखल घेताना मंदिराची ऐतिहासिक परंपरा, स्थानिक रितीरिवाज आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील सत्यता न तपासता मत व्यक्त करणे म्हणजे श्रद्धा स्थानाची प्रतिना मलीन करण्यासारखे असून या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी. - राजेंद्र शितोळे, रोटी