शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याच्या शोधार्थ मोरांची भटकंती

By admin | Updated: April 19, 2017 04:12 IST

आंबळे, कळवंतवाडी, आनोसेवाडी (ता. शिरूर) परिसरात पाणीसाठे संपुष्टात आल्याने अन्न-पाण्याच्या शोधासाठी मोरांची वणवण सुरू झाली आहे

न्हावरे : आंबळे, कळवंतवाडी, आनोसेवाडी (ता. शिरूर) परिसरात पाणीसाठे संपुष्टात आल्याने अन्न-पाण्याच्या शोधासाठी मोरांची वणवण सुरू झाली आहे. दरम्यान, या परिसरातील मोरांचे अस्तित्व टिकवण्यासाठी सामाजिक संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन या भागातील ग्रामस्थांकडून करण्यात आले आहे.शिरूर तालुक्याच्या पूर्वभागातील आंबळे, आनोसेवाडी, मोटेवाडी, गोलेगाव, भोसवाडी, थेऊरकरवाडी, दहीवडी, पारोडी, भांबर्डे या परिसरात अनेक वर्षांपासून मोरांचे अस्तित्व आहे. दहा वर्षांपूर्वी या भागात चासकमान प्रकल्पाचे पाणी फिरल्याने मोरांना पिण्याचे पाणी, नैसर्गिक खाद्य उपलब्ध होऊ लागले. त्यामुळे या भागात दिवसेंदिवस मोरांची संख्या वाढू लागली आहे. काही दिवसांपासून या भागातील लघुपाटबंधारे, पाझर तलाव, ओढे, नाले आटल्याने पिण्याच्या पाण्यासाठी मोरांना रणरणत्या उन्हात भटकंती करावी लागत आहे. त्याचबरोबर सध्या या भागात मोरासाठीचे नैसर्गिकरीत्या उपलब्ध होणारे खाद्यही संपुष्टात आले आहे. बहुतेक शेतकरी आपल्या घरातील धान्य मोरांसाठी खायला टाकतात. या भागात मोर, पक्षी इतके माणसाळलेले आहेत की, त्यांचा वावर शेतकऱ्यांच्या शेतापाासून जनावरांच्या गोठ्यापर्यंत, एवढेच नाही तर अगदी घरापर्यंत असल्याचा दिसून येतो.(वार्ताहर)या भागातील शेतकरी आपल्या घरातील अन्नधान्य मोरांना खाण्यासाठी टाकतात. तसेच, काळजीने त्यांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करतात. मात्र, मोरांबाबत काही दुर्घटना घडल्यास त्याचा वनविभागाकडून होणारा नाहक बडगा अथवा कारवाईचा त्रास शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. मोरांना अन्नपाणी पुरवताना शेतकऱ्यांची मोठी कुचंबणा होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. मात्र, मोर आपल्या परिसराचे एक वैभव आहे. या भावनेपोटी कसल्याही कारवाईच्या भीतीला न जुमानता आपण मोरांना अन्नधान्य पुरवतो, असे येथील ग्रामस्थांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. दरम्यान, या भागातील मोरांचे अस्तित्व टिकवण्यासाठी सामाजिक संस्था व वनविभाग पुढाकार घेणे गरजेचे आहे.