शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
2
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
3
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
4
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
5
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
6
“संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करा”; विजय वडेट्टीवारांची मागणी, CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
7
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
8
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
9
संशयास्पद हालचाली, RPF पथकाची पाळत; सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला
10
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
11
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
12
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
13
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
14
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
15
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
16
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
17
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
18
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
19
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
20
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

जेवढे अधिकृत तेवढेच अनधिकृत ‘जोड’

By admin | Updated: August 23, 2015 04:42 IST

शहरातील प्रत्येकाला पाणी पुरविणे ही महापालिकेची जबाबदारी आहे. त्यासाठी महापालिकेकडून ठरावीक शुल्क आकारून मागणी करणाऱ्या प्रत्येकाला नळजोड दिले जातात.

-  सुनील राऊत,  पुणेशहरातील प्रत्येकाला पाणी पुरविणे ही महापालिकेची जबाबदारी आहे. त्यासाठी महापालिकेकडून ठरावीक शुल्क आकारून मागणी करणाऱ्या प्रत्येकाला नळजोड दिले जातात. मात्र, महापालिकेने शहरात जेवढे अधिकृत नळजोड दिले आहेत त्याच्यापेक्षा दीड पट अनधिकृत नळजोड शहरात आहेत. विशेष म्हणजे, या अनधिकृत नळजोड घेणाऱ्यांमध्ये लोकप्रतिनिधीही आघाडीवर असून, अनेकांच्या घरात डझनभर नळजोड असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडे आहे. या नळजोडांचा वापर हॉटेल, मंगल कार्यालये, बांधकामे, पाण्याचे टँकर भरून देणे यासह अनेक कामांसाठी केला जात असल्याने दरवर्षी जवळपास लाखो लिटर पिण्याचे पाणी वाया जात असल्याने प्रामाणिकपणे नळजोड घेणाऱ्यांचा घसा मात्र कोरडाच राहात आहे.१ लाख ९६ हजार अनधिकृत नळजोड महापालिका प्रशासनाकडून शहरात पाणीपुरवठा करण्यासाठी तब्बल २६00 किलोमीटरच्या जलवाहिन्यांचे जाळे टाकण्यात आले आहे. या जलवाहिन्यांवरून महापालिकेने अधिकृतपणे शहरातील मिळकती तसेच सोसायट्यांना १ लाख ६0 हजार नळजोड दिलेले आहेत. तर प्रशासनाकडे असलेल्या माहितीनुसार, शहरात तब्बल १ लाख ९६ हजार अनधिकृत नळजोड आहेत. विशेष म्हणजे, यातील बहुतांश नळजोड हे व्यावसायिक कारणास्तव वापरले जातात. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा अपव्यय होतोय. या पेक्षाही गंभीर बाब म्हणजे या नळजोड धारकांकडून एक रुपयाचीही पाणीपट्टी महापालिका प्रशासनास भरली जात नाही. त्यामुळे दरवर्षी महापालिकेला सुमारे ६0 ते ७0 कोटींचा भुर्दंडही सहन करावा लागत असल्याचे वास्तव आहे.आम्ही घेतले तुम्हीही घ्या... हे घेण्यात आलेले बहुतांश अनधिकृत नळजोड स्थानिक लोकप्रतिनिधींच्या कृपेने घेण्यात येतात. शहरात प्रामुख्याने झोपडपट्ट्यांच्या परिसरामध्ये हे नळजोड घेण्यात आलेले आहेत. मात्र, यापेक्षाही धक्कादायक बाब म्हणजे ज्या लोकप्रतिनिधींकडून हे अनधिकृत नळजोड दिले जातात, त्यांच्या घरांमध्येच पाच ते दहा नळजोड असल्याचेही दिसून आले आहे. विशेष बाब म्हणजे शहरातून जाणाऱ्या मुख्य जलवाहिन्यांवरून हे नळजोड घेतले गेले असल्याने त्यांच्या घरांमध्ये चोवीस तास पाणीपुरवठा सुरू राहतो. अशाच प्रकारची एक मुख्य जलवाहिनी पर्वती ते वैकुंठ स्मशानभूमीपर्यंत आहे. ही जलवाहिनी उतारावर असल्याने संपूर्ण वर्षभर त्यात पाणी असते. त्यामुळे या जलवाहिनीवरून या लोकप्रतिनिधींनी पाच ते दहा किलोमीटर लांब पर्यंत जलवाहिन्या टाकून हे नळजोड घेतलेले आहेत.वॉटर मीटरशिवाय पर्याय नाही... शहरातील ही पाणीचोरी रोखायची असल्यास महापालिकेस प्रत्येक मिळकतीत सुरू असलेल्या नळाला वॉटर मीटर बसविण्याशिवाय पर्याय नाही. महापालिकेकडून अनेकदा या अनधिकृत नळजोडांचे सर्वेक्षण हाती घेण्यात आले आहे. मात्र, सर्वेक्षणासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांना माहिती दिली जात नाही. तर नळजोडाची माहिती मिळाल्यानंतर कारवाईस गेलेल्या कर्मचाऱ्यांना नागरिकांच्या रोषास सामोरे जावे लागते. त्यामुळे महापालिकेकडून प्रस्तावित करण्यात आलेल्या समान पाणी मीटर वाटप योजनेत प्रत्येक नळजोडास वॉटर मीटर प्रस्तावित करण्यात आला आहे. त्यासाठी तब्बल ९00 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, सुमारे साडेतीन लाख वॉटर मीटर पालिकेकडून प्रस्तावित करण्यात आले आहेत. ५० हजार मोटारी ओढाताहेत पाणी शहरात बेकायदेशीरपणे घेतलेल्या या अनधिकृत नळजोडांना पाणी पुरेशा दाबाने येत नाही म्हणून तब्बल ५0 हजार पाणी खेचणाऱ्या मोटारी शहरात ठिकठिकाणी असल्याची माहिती महापालिकेचे अधिकारीच खासगीत बोलताना देतात. एखाद्या परिसरात अशा मोटारी लावल्या गेल्यास त्या परिसरातील इतर नागरिकांना थेंबभर पाणी मिळण्याची बोंबही होते. पालिकेकडून वर्षभर अशा मोटारींवर कारवाई केली जाते. मात्र, त्यात सातत्य नसल्याने तसेच केवळ तक्रार आली तरच कारवाई केली जात असल्याचेही दिसून येते.