शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
3
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
4
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
8
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
9
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
10
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
11
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
12
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
13
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
14
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
15
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
16
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
17
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
18
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
19
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
20
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
Daily Top 2Weekly Top 5

मेथीने बनविले शेतकऱ्याला लखपती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2019 12:17 IST

अतिवृष्टीने मेथी, कोथिंबीर या पिकांचे नुकसान झाल्याने तुटवडा

ठळक मुद्देएकूण ६० किलो मेथी उत्पादनासाठी पाच हजार शंभर रुपये खर्च

मंचर : अतिवृष्टीने मेथी, कोथिंबीर या पिकांचे नुकसान झाल्याने तुटवडा भासत आहे. परिणामी, दोन्ही पिकाचे बाजारभाव कडाडले आहेत. भाववाढीचा मोठा फायदा सातगाव पठार भागातील भावडी येथील अशोक बाजारे यांना झाला आहे. बटाटा पिकानंतर मेथीचे पीक घेणारे बाजारे यांना या पीकाने लखपती बनवले आहे. बाजारे यांच्या शेतात येऊन व्यापारी मेथी खरेदी करीत आहेत. आंतरपीक म्हणून मेथीत काकडीचे पीक घेतले आहे. त्याचेही त्यांना भरघोस उत्पन्न मिळेल, असा अंदाज आहे. कमी दिवसांत व कमी भांडवलात येणारी मेथी, कोथिंबीर ही पिके शेतकरी वर्षातून अनेकवेळा घेतो. या पिकांना चांगला बाजारभाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचा कल या पिकाकडे वाढला आहे. या वर्षी पावसाने चांगलाच तडाखा दिला. अतिवृष्टीने मेथी, कोथिंबीर या पिकांना फटका बसला. असे असले तरी काही शेतकऱ्यांनी यशस्वी पीक घेतले आहे. सातगाव पठार भाग बटाटा उत्पादनासाठी राज्यात प्रसिद्ध आहे. सुमारे सहा हजार एकर क्षेत्रात बटाटा लागवड होते. बटाटापीक काढल्यानंतर पिकाचा फेरपालट म्हणून अनेक शेतकरी मेथी, कोथिंबिरीचे पीक घेतात. हा भाग पूर्णपणे पावसावर अवलंबून आहे. रब्बी हंगामात पाणीटंचाई जाणवते. म्हणूनच कमी दिवसांत येणारी भाजीपाला पिके घेतली जातात.........एकूण ६० किलो मेथी उत्पादनासाठी पाच हजार शंभर रुपये खर्च आला. बटाटापिकाच्या काढणीनंतर हे मेथीपीक घेतले. एकदा खताची मात्रा दिली, तर दोनदा औषध फवारणी केली आहे. एक किलो मेथीतून ८० ते १०० जुड्या निघतात. शेकडा २,५०० ते ३,००० रुपये भाव मिळत असल्याने मेथीपिकाचे चांगले उत्पन्न मिळत आहे. एक लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.- अशोक बाजारे, मेथी उत्पादक, भावडी ..........४सातगाव पठार भागातील भावडी येथील शेतकरी अशोक बाजारे यांनी सहा एकर क्षेत्रात मेथीचे यशस्वी उत्पादन घेतले आहे. शेतातील बटाटा पीक निघेल, तस-तशी वेळोवेळी मेथी शेतात टाकली. चारशे किलो मेथी बी बाजारे यांनी शेतात टाकले. पिकाला बी, औषधे व खते हाच खर्च आला. पीक जोमदार आल्याने व्यापाºयांनी शेताच्या बांधावर येऊन  खरेदी केले. ४शेवटचे ६० किलो मेथी बाजारे यांनी एक लाख पाच हजार रुपयांना दिले. व्यापारी शेतातील मेथी काढून ती बाजारात नेत असल्याने वाहतुक खर्च वाचला आहे. थोड्या दिवसात चांगले उत्पादन निघत असल्याने मागील दोन ते तीन वर्षांपासून सातगाव पठार भागातील शेतकरी मेथी, कोथिंबीर पीक मोठ्या प्रमाणावर घेत आहेत.  ४भागातील वातावरण या पिकाला पोषक असून दोन्ही पिकांनी शेतकºयांना चांगलाच आधार दिला आहे.बाजारे यांनी मेथीत आंतर पीक म्हणून काकडी घेतली आहे.

टॅग्स :Mancharमंचरagricultureशेतीvegetableभाज्याFarmerशेतकरी