इंदापूरात भाजप शिक्षक आघाडीच्या वतीनं मोर्चा; विविध मागण्यांसाठी राज्यभरात आंदोलन सुरु

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2021 05:25 PM2021-09-08T17:25:39+5:302021-09-08T17:25:49+5:30

सबंध राज्यामध्ये बुधवारी भाजप शिक्षक आघाडी आपल्या विविध मागण्यासाठी आंदोलन करत आहे.

Morcha on behalf of BJP Teachers Front in Indapur; Agitations started across the state for various demands | इंदापूरात भाजप शिक्षक आघाडीच्या वतीनं मोर्चा; विविध मागण्यांसाठी राज्यभरात आंदोलन सुरु

इंदापूरात भाजप शिक्षक आघाडीच्या वतीनं मोर्चा; विविध मागण्यांसाठी राज्यभरात आंदोलन सुरु

googlenewsNext
ठळक मुद्देपंचायत समितीच्या आवारामध्ये धरणे आंदोलन करून सरकारला आपल्या विविध मागण्यांचे लेखी निवेदन दिले

बारामती : भाजप शिक्षक आघाडीने आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यभर आंदोलन सुरु केलंय. इंदापुरातही तालुका भाजपाशिक्षक आघाडीच्या वतीनं आज माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बाबा चौक ते पंचायत समिती पर्यंत घोषणा देत मोर्चा काढला. तसेच पंचायत समितीच्या आवारामध्ये धरणे आंदोलन करून सरकारला आपल्या विविध मागण्यांचे लेखी निवेदन दिले आहे.

त्यानुसार इंदापूर येथे पुणे जिल्हा भाजपा शिक्षक आघाडीचे अध्यक्ष संतोष कदम, नगरसेवक कैलास कदम आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी राजकुमार बामणे आणि इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक तय्यब मुजावर यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

काय आहेत प्रमुख मागण्या 

शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी

- वरिष्ठ व निवड श्रेणी च्या प्रशिक्षणाच्या तारखा तात्काळ घोषित कराव्यात

- १ नोव्हेंबर २००५ पूर्वी अंशत: अनुदानित शाळांमध्ये नियुक्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचं बंद केलेलं भविष्य निर्वाह निधीचं खातं तात्काळ सुरू करावं

- एक तारखेला वेतन  मिळण्याबाबत व वेतनास विलंब करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावे

- परिविक्षाधीन सहाय्यक शिक्षक (शिक्षण सेवक) परिविक्षाधीन शिक्षकेत्तर कर्मचारी (शिक्षकेत्तर सेवक) यांचे मानधन सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वाढवावी

- शिक्षक भरती प्रक्रिया तात्काळ सुरू करावी

- शिक्षकांना व शिक्षकेत्तर कर्मचाºयांना त्री- स्तरीय १० , २०, ३० आश्र्वासित प्रगती योजना तात्काळ लागू करावी, घोषित ,अघोषित व मूल्यांकनास पात्र तुकड्या, शाळांना व कनिष्ठ महाविद्यालयांना अनुदान देण्याची प्रत्यक्ष कार्यवाही करावी

- रात्र शाळेतील कर्मचाऱ्यांना १७ मे २०१७ च्या शासन निर्णयानुसार पूर्णकालिन कर्मचाऱ्यांप्रमाणे सर्व प्रकारचे लाभ मिळावा असं निवेदनात नमूद करण्यात आलंय

Web Title: Morcha on behalf of BJP Teachers Front in Indapur; Agitations started across the state for various demands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.