शहरं
Join us  
Trending Stories
1
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
2
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
3
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
4
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
5
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
6
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
7
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
8
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
9
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
10
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
11
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
12
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
13
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
14
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
15
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
16
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
17
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
18
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
19
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
20
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

चंद्र दर्शन झाले, आज रमजान ईद

By admin | Updated: June 26, 2017 04:07 IST

शहरात रविवारी सायंकाळी चंद्रदर्शन झाल्याने सोमवारी रमजान ईद साजरी करण्यात येणार आहे. रमजान ईदनिमित्त गोळीबार

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : शहरात रविवारी सायंकाळी चंद्रदर्शन झाल्याने सोमवारी रमजान ईद साजरी करण्यात येणार आहे. रमजान ईदनिमित्त गोळीबार मैदानाजवळील ईदगाह मैदान सामूहिक नमाजपठणासाठी सज्ज करण्यात आले आहे. सोमवारी ईद होणार हे निश्चित झाल्यानंतर रमजान ईद निमित्त शुभेच्छांची देवाण-घेवाण सुरू झाली होती. त्याचबरोबर नातेवाईक, मित्र-परिवाराला ईद निमित्त सहकुटुंब घरी येण्याचे निमंत्रण देण्यात आले. इस्लामिक कालदर्शिकेच्या नियमाप्रमाणे नववा रमजान महिना संपत असून, सोमवारी दहावा महिना शव्वालचा प्रारंभ होणार आहे. या महिन्याच्या पहिल्या दिवशी सर्व मुस्लिमबांधव ईद-उल-फित्र अर्थात, रमजान ईद साजरी करतात. ईद-उल-फित्र निमित्त शहरात ठिकठिकाणी सामूहिक नमाजपठण करण्यात येते. त्यासाठी शहरात काही ठिकाणी सकाळी वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले आहेत. नमाजपठणामुळे वाहतुकीत बदलईगाह मैदानात होणाऱ्या नमाजासाठी सोमवारी सकाळी ६ वाजल्यापासून नमाज पठण होईपर्यंत मम्मादेवी चौक ते गोळीबार मैदान आणि तिथपासून ढोलेपाटील चौकापर्यंतची सर्व प्रकारची वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. त्याचबरोबर खडकी बाजार, चिंचवड, भोसरी, हांडेवाडी रोड, हडपसर, घोरपडी बाजार, डायमंड कंपनी, मुंढवा परिसरात नमाज पठण होत असताना वाहतूक बंद राहणार आहे, त्यामुळे नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.