'बारामतीचे डॉन' असल्याचे सांगत उद्योजकाकडून उकळले पैसे; तिघांवर गुन्हा दाखल; एक अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 20:52 IST2025-10-31T20:51:39+5:302025-10-31T20:52:05+5:30

नाहीतर तुला बारामतीत राहू देणार नाही' अशा धमक्या दिल्या. त्यानंतर कधी ४ हजार, कधी दहा हजार रुपये अशा हप्त्यांमध्ये पैसे वसूल करण्यात आले.

Money extorted from businessman claiming to be Don of Baramati Case registered against three; One arrested | 'बारामतीचे डॉन' असल्याचे सांगत उद्योजकाकडून उकळले पैसे; तिघांवर गुन्हा दाखल; एक अटक

'बारामतीचे डॉन' असल्याचे सांगत उद्योजकाकडून उकळले पैसे; तिघांवर गुन्हा दाखल; एक अटक

बारामती : कटफळ (ता.बारामती) येथील अवजारे बनवणाऱ्या उद्योजकाकडून डॉन असल्याचे सांगून वारंवार धमक्या देत ८५ हजार रुपये वसूल केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी बारामती तालुका पोलिसांत फिर्याद दाखल आहे.

फिर्यादी हे बारामती एमआयडीसीमध्ये येथे अवजारे बनवणारी कंपनी चालवतात. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ऑक्टोबर २०२४ पासून निरज रॉय, शुभम मोरे व भूषण रणसिंगे या तिघांनी स्वतःला 'बारामतीचे डॉन' असल्याचे सांगत त्यांच्याकडून ऑनलाइन व रोख स्वरूपात वेळोवेळी पैसे घेतले. हे आरोपी तक्रारदारांना बारामतीतील विविध हॉटेलमध्ये भेटून दारूचे बिल भरण्यास भाग पाडत होते.एप्रिल २०२५ पासून आरोपींनी 'तुला कंपनी चालवायची असेल तर महिन्याला पैसे द्यावे लागतील, नाहीतर तुला बारामतीत राहू देणार नाही' अशा धमक्या दिल्या. त्यानंतर कधी ४ हजार, कधी दहा हजार रुपये अशा हप्त्यांमध्ये पैसे वसूल करण्यात आले.

ऑक्टोबर २०२५ मध्ये पेन्सिल चौक येथे थांबवून 'दारूचे बिल भर नाहीतर हातपाय मोडीन' अशी धमकी देत फिर्यादीस मारहाण करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. याच महिन्यात वंजारवाडीजवळ आरोपींनी त्यांच्याकडून २० हजार रुपये ऑनलाइन मागवले व धमकीखाली त्यांचा व्हिडीओ रेकॉर्ड केल्याचेही फिर्यादीने सांगितले आहे. पुढे दि. १८ ऑक्टोबर रोजी रात्री अमरदीप हॉटेल येथेही आरोपींनी पुन्हा भेट देऊन १३ हजार रुपये मागितले व मारहाणीचा प्रयत्न केला.या सर्व कालावधीत आरोपींनी एकूण ८५ हजार रुपयांहून अधिक रक्कम घेतली असून, 'आता पैसे दिले नाहीत तर जिवे मारू' अशी धमकी दिल्याचे फिर्यादी यांनी तक्रारीत म्हटले आहे.

बारामती तालुका पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी ही बाब गांभीर्याने घेत राॅय यास अटक केली आहे. न्यायालयाने आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली. ही कारवाई पोलिस अधीक्षक पुणे ग्रामीण संदीपसिंह गिल्ल, अपर पोलिस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव ,पोलीस उपनिरीक्षक युवराज पाटील, पोलीस राजेंद्र बन्ने, दादा दराडे, सुरेंद्र वाघ, भारत खारतोडे, संतोष कांबळे, नीलेश वाकळे यांनी केली.

Web Title : बारामती में 'डॉन' की वसूली: व्यवसायी को धमकी, पैसे जब्त; तीन पर मामला

Web Summary : बारामती में खुद को डॉन बताकर तीन लोगों ने एक व्यवसायी को धमकाकर ₹85,000 वसूले। पुलिस ने एक आरोपी को गिरफ्तार किया। आगे की जांच जारी है।

Web Title : Baramati 'Don' Extortion: Businessman Threatened, Money Seized; Three Booked

Web Summary : Three individuals, claiming to be Baramati dons, extorted ₹85,000 from a businessman by threatening him. Police arrested one accused. Further investigation is underway.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.