शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

एकापेक्षा अधिक अनधिकृत बांधकामे करणाऱ्यांवर मोक्का : पालिकेचा निर्णय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2019 07:00 IST

पुणे शहरातील सीमाभिंती कोसळून आतापर्यंत २१ कामगारांचा बळी गेला आहे.

ठळक मुद्देपोलीस आयुक्तांना पत्र देण्यात येणारगेल्या काही वर्षांमध्ये शहराच्या उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे वाढलेली शहरभरातील बांधकाम साईट्सवरील लेबर कॅम्प्स आणि सुरक्षा व्यवस्थेची झाडाझडतीस सुरुवात

पुणे : सीमाभिंती कोसळून आतापर्यंत २१ कामगारांचा बळी गेला असून महापालिकेने शहरभरातील बांधकाम साईट्सवरील लेबर कॅम्प्स आणि सुरक्षा व्यवस्थेची झाडाझडती घेण्यास सुरुवात केली आहे. पालिकेने आपला मोर्चा अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांकडेही वळविला असून यापुढे एकापेक्षा अधिक अनधिकृत बांधकामे करणाऱ्या बिल्डर्सविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी विरोधी कायद्यान्वये (मोक्का) कारवाई केली जाणार असल्याची माहिती मुख्य बांधकाम अभियंता प्रशांत वाघमारे यांनी दिली. गेल्या काही वर्षांमध्ये शहराच्या उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे वाढलेली आहेत. शहर आणि ग्रामीण भागातील सीमाभागामध्ये ग्रामपंचायतींच्या हद्दीत मोठ्या प्रमाणावर बांधकामे उभी राहिली आहेत. पालिकेच्या हद्दीमध्ये नव्याने समाविष्ठ झालेल्या गावांमध्येही मोठ्या प्रमाणावर बांधकामे उभी राहात आहेत. ही बांधकामे अधिकृत आणि अनधिकृत अशा दोन्ही स्वरुपाची आहेत. यातील बहुतांश बांधकामे अनधिकृतच असतात. गुंठेवारीत अनधिकृत बांधकामे करणारे व्यावसायिक  ग्रामपंचायत सॅक्शन्ड अशा गोंडस नावाखाली ग्राहकांना घरे विकत आहेत. महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून अनधिकृत बांधकामांविरुद्ध मोहिम उघडण्यात आली आहे. मागील तीन-चार महिन्यांपासून कोंढवा परिसरावर पालिकेने विशेष लक्ष केंद्रित केले होते. या भागातील अनधिकृत बांधकामांची जंत्रीच बांधकाम विभागाने तयार केली आहे. गेल्या तीन-चार महिन्यात पालिकेकडून तब्बल ३० बांधकाम व्यावसायिकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याचा तपास पोलिसांकडून सुरु आहे. परंतू, गुन्हे दाखल करुनही काही व्यावसायिक बधत नसल्याचे पालिकेच्या पाहणीमध्ये समोर आले आहे. त्यामुळे अशा बेदरकार बांधकाम व्यावसायिकांना चाप लावण्यासाठी पालिकेने पोलिसांचे हत्यार वापरण्याचा निर्णय घेतला आहे. एकदा नोटीस देऊन अथवा गुन्हे दाखल करुनही जे बांधकाम व्यावसायिक पुन्हा अनधिकृत बांधकाम करतील त्यांच्यावर यापुढे थेट मोक्का लावण्यात येणार आहे. अनधिकृत बांधकाम करणे कायद्याने गुन्हा असून नागरिकांच्या जिविताशी खेळण्याचाच हा प्रकार आहे. या अनधिकृत बांधकामात अनेकजण सहभागी असतात. त्यामुळे हा संघटीत गुन्हेगारीसारखाच प्रकार आहे. यासंदर्भात पोलीस आयुक्तांना पत्र देण्यात येणार आहे. त्यामुळे आगामी काळात अनधिकृत बांधकामांना आळा बसू शकेल असा अंदाज अधिकारी व्यक्त करीत आहेत. ====शहराभोवती मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे उभी राहात आहेत. आम्ही काही दिवसांपासून कोंढव्यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. गेल्या तीन-चार महिन्यात ३० गुन्हे दाखल करण्यात आले असून जे व्यावसायिक एकापेक्षा अधिक वेळा अनधिकृत बांधकामे करतील त्यांच्यावर थेट मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. यासंदर्भात पोलीस आयुक्तांशी पत्रव्यवहार केला जाणार आहे. - प्रशांत वाघमारे, मुख्य अभियंता, बांधकाम विभाग

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस