रोटरी क्लब ऑफ आळेफाटा मेनच्या अध्यक्षपदी मोहन जाधव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:23 IST2021-09-02T04:23:42+5:302021-09-02T04:23:42+5:30

या पदग्रहण समारंभात उपाध्यक्षपदाचा संपत रहाणे व श्रीकांत मदने यांनी पदभार स्वीकारला. या वेळी रोटरी क्लबचे डिस्ट्रिक गव्हर्नर पंकज ...

Mohan Jadhav as the President of Rotary Club of Alleppey Main | रोटरी क्लब ऑफ आळेफाटा मेनच्या अध्यक्षपदी मोहन जाधव

रोटरी क्लब ऑफ आळेफाटा मेनच्या अध्यक्षपदी मोहन जाधव

या पदग्रहण समारंभात उपाध्यक्षपदाचा संपत रहाणे व श्रीकांत मदने यांनी पदभार स्वीकारला. या वेळी रोटरी क्लबचे डिस्ट्रिक गव्हर्नर पंकज शहा, युवा नेते अमित बेनके, जिल्हा परिषद सदस्य शरद लेंडे, रोटेरियन मोहन पाटील, भुजबळ असिस्टंट गव्हर्नर राजेंद्र जाधव, पंचायत समिती सदस्य जीवन शिंदे, श्याम माळी, माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर कु-हाडे, प्रसन्न डोके, धनंजय काळे श्री ज्ञानेश्वर महाराज देवस्थान संस्थानचे अध्यक्ष चारूदत्त साबळे, सचिव संतोष पाडेकर, खजिनदार संजय खंडागळे, संजय कुऱ्हाडे, म्हतुजी सहाणे, सरपंच प्रीतम काळे, संतवाडी सरपंच नवनाथ निमसे, कोळवाडी सरपंच शैला गाढवे, रोटरी क्लबचे मावळते अध्यक्ष शिवाजी गोरे, सुधीर नरवडे, विशाल पाटील, भुजबळ, संपत रहाणे, श्रीकांत मदने, संदीप वाघोले उपस्थित होते.

रोटरी क्लबच्या माध्यमातून समाजोपयोगी व आरोग्यविषयक उपक्रम सर्वांनी राबवण्याचे आवाहन डिस्ट्रिक गव्हर्नर पंकज शहा व युवा नेते अमित बेनके यांनी केले. तर, वर्षभरात रोटरी क्लबच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती नूतन अध्यक्ष मोहन जाधव व उपाध्यक्ष श्रीकांत मदने यांनी दिली. या वेळी मंदिर परिसरात भाविकांना शुध्द पिण्याचे पाणीसाठी रोटरी क्लबच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या जलशुध्दीकरण प्रकल्पाचे उद्घाटन मान्यवरांनी केले. संदीप वाघोले यांनी सूत्रसंचलन केले, तर राजेंद्र जाधव यांनी आभार मानले.

०१ आळेफाटा रोटरी

010921\img-20210901-wa0177.jpg

रोटरी क्लब ऑफ आळेफाटा मेनका पदग्रहन समारंभ

Web Title: Mohan Jadhav as the President of Rotary Club of Alleppey Main