शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधानांची ससूनमधील डॉक्टरांशी 'मन की बात'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2020 14:50 IST

पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी पुण्यातील ससूनच्या डाॅक्टरांशी संवाद साधत त्यांच्या कार्याचे काैतुक केले.

पुणे : 'नमस्ते डॉक्टर, तुम्ही प्रभुसेवेप्रमाणे जनसेवा करत आहात... कोरोनाविषयी लोकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत... देशवासियांना तुमच्याकडून संदेश हवा आहे...' असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ससून रुग्णालयातील डॉ. रोहिदास बोरसे यांच्याशी 'मन की बात' सुरू केली. कोरोना रुग्णांची स्थिती, होम क्वारंटाईनची माहिती घेत मोदींनी 'तुम्हा सर्वांच्या मदतीने कोरोनाविरुद्ध ची लढाई देश जिंकेल,' असा विश्वास व्यक्त केला.

पंतप्रधान मोदी यांनी दोन दिवसांपूर्वीच नायडू रुग्णालयातील परिचारिका छाया जगताप यांच्याशी संवाद साधून विचारपुस केली होती. तसेच त्यांच्या कामाचे कौतुकही केले होते. तर रविवारी त्यांनी 'मन की बात' मध्ये डॉ. बोरसे यांच्याशी संवाद साधला. डॉ. बोरसे हे बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात मेडिसिन विभागातील प्राध्यापक आहेत. तसेच नायडू रुग्णालयातील कोरोना कक्षाची जबाबदारी ही त्यांच्यावर आहे. त्यामुळे पंतप्रधानांनी त्यांच्याकडून कोरोनाची येथील सद्यस्थिती जाणून घेतली. 'मन की बात'ला सुरुवात करताना मोदींनी प्रभुसेवेप्रमाणे जनसेवा करत असल्याबद्दल त्याचे कौतुक केले. तसेच 'लोकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. आपण या सेवेला समर्पित केले आहे . त्यामुळे तुमच्या शब्दांमध्ये ताकद आहे. तुम्हीच लोकांना संदेश द्या,' असे आवाहन मोदींनी केले. त्यावर डॉ. बोरसे यांनी नायडू रुग्णालयातील कोरोनाग्रस्त व बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची माहिती दिली. 'तरुणांनाही कोरोनाशी लागण होत आहे. पण त्यांच्यातील लक्षणांचे स्वरूप सौम्य आहे. तेही बरे होतील.परदेशातून आलेले व त्यांच्या संपर्कातील संशयितांचेच आपण नमुने घेत आहोत. त्यांना लागण झाली नसेल तर होम क्वारंटाईन चा सल्ला देतो,' असे बोरसे यांनी सांगितले.

मोदींनी लगेच प्रतिप्रश्न करून घरात राहण्यासाठी कसे समजावता, अशी विचारणा केली. बोरसे यांनी त्याबाबत सविस्तर माहिती दिली. या सर्व गोष्टी ऐकून घेत मोदींनी शेवटी त्यांच्या कामाबद्दल आभार व्यक्त केले. 'तुम्ही समर्पित भावनेने काम करत आहेत. त्यामुळे सर्व रुग्ण सुरक्षितपणे घरी जातील हा विश्वास आहे. तुम्हा सर्वांच्या मदतीने देश ही लढाई नक्की जिंकेल,' असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला. त्यावर बोरसे यांनींनी 'हम जितेंगे' असे म्हणत त्यांना साथ दिली.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीPuneपुणेdoctorडॉक्टरsasoon hospitalससून हॉस्पिटल