शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
2
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
3
वादावर पडदा? सॅम पित्रोदांनी दिला IOC अध्यक्षपदाचा राजीनामा, पक्षानेही तात्काळ स्वीकारला
4
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
5
"विचित्र बडबड करणं सॅम पित्रोदांचा स्वभाव, त्यांनी भारताचा अपमान केलाय"; रामदास आठवलेंची शाब्दिक चपराक
6
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
7
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
8
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
9
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
10
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
11
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
12
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
13
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
14
चीनचं टेन्शन वाढणार! ज्या बाजारावर होता दबदबा, आता त्यावर भारत राज्य करणार
15
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
16
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
17
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
18
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
20
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...

मोदींनी सामान्य जनतेची फसवणूक केली- सुप्रिया सुळे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2019 2:14 AM

राज्य आणि देश चालवण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी सरकारच योग्य आहे, असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.

भोर : ना प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख जमा झाले, ना दोन कोटी तरुणांना नोकऱ्या दिल्या, ना देशाबाहेरील काळा पैसा आणला ना अच्छे दिन आले. उलट देशावर ५४ लाख कोटींचे कर्ज केले. भाजपाने जाहीरनाम्यात दिलेल्या एकाही गोष्टीची पूर्तता केली नाही, तर मोदी आणि फडणवीस यांनी लोकांची फसवणूक केली आहे. यामुळे राज्य आणि देश चालवण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी सरकारच योग्य आहे, असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.राष्ट्रवादीचे माजी अध्यक्ष चंद्रकांत बाठे यांच्या विशेष प्रयत्नाने किकवी, पाचलिंगे, मोरवाडी, राऊतवाडी, वागजवाडी येथील १ कोटी ५३ लाख रुपये विविध विकासकामांचे उद्घाटन खासदार सुळे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी माजी जि. प. सदस्य चंद्रकांत बाठे होते. यावेळी प्रदीप खंदारे, संतोष घोरपडे, भालचंद्र जगताप, रणजित शिवतरे, सुनीता बाठे, विद्या यादव, नितीन धारणे, बाळासाो दळवी, नारायण अहिरे, शिवाजी कोंडे, मनोज खोपडे, केतन चव्हाण उपस्थित होते.सुप्रिया सुळे म्हणाल्या, की मतदान हे यंत्रापेक्षा मतपत्रिकेवर घ्यावे, अशी मागणी राष्ट्रवादीसह इतर १६ पक्षांनी केली आहे, तर मतदान यंत्रातील गैरप्रकाराची सीबीआयमार्फत चौकशीची मागणी केली होती. मात्र सीबीआयवर आमचा विश्वास कमी झाला आहे.गोपीनाथ मुंढे यांची हत्या मतदान यंत्रातील गैरप्रकारातून झाली, अशी बातमी परदेशातून आली आहे. त्यामुळे या दोन्ही गोष्टीची चौकशी आंतरराष्ट्रीय रॉ (रिसर्च अँड अ‍ॅनालिसिस विंग) या संस्थेमार्फत करावी, अशी मागणी सुळे यांनी केली.

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेNarendra Modiनरेंद्र मोदीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस