शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांचा मोबाईल ‘हँग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाने अंगणवाड्या हायटेक व पेपरलेस करण्यासाठी मोठा गाजावाज करत सर्व ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाने अंगणवाड्या हायटेक व पेपरलेस करण्यासाठी मोठा गाजावाज करत सर्व अंगणवाडी सेविकांना मोबाईल वाटप केले खरे, पण गेल्या दोन अडीच महिन्यांपासून सर्व अंगणवाडी सेविकांचे मोबाईल बंद पडले आहेत. परंतु रेकॉर्ड अपटेड ठेवण्यासाठी आता सर्व सेविकांना स्वखर्चांने रजिस्टर खरेदी करून माहिती भरावी लागत आहे.

शासनाने अंगणवाडी सेविकांना विविधी माहिती ऑनलाईन भरण्यासाठी मोबाईल हॅण्डसेट दिले होते. पुणे जिल्ह्यातील ४ हजार ३८८८ अंगणवाडी सेविकांना मोबाईल वाटप केले आहे. या मोबाईलमुळे खर तर अंगणवाडी सेविकांचे काम वाढले आहे. यात या मोबाईलवर दररोजची हजेरी भरणे, गृहभेटीची माहिती, लसीकरण आदी माहिती मोबाईल ॲपद्वारे भरावी लागते. परंतु गेल्या दोन अडीच महिन्यांपासून हे मोबाईल बंद पडले आहेत.

जिल्ह्यात एकूण अंगणवाडी : ४३८८

- मिनी अंगणवाड्या : ४४१

- अंगणवाडी सेविका : ३९४७

- मिनी अंगणवाडी सेविका : ४४१

- मोबाईल वाटप : ४३८८

--

मोबाईलवरून करावी लागतात ही सरकारी कामे

अंगणवाडी सेविकांना मोबाईल ॲपवर अंगणवाडीत येणाऱ्या सर्व मुलांची हजेरी भरणे, गरोदर माता, मुलांची माहिती देण्यासाठी वेळोवेळी गृहभेटी दिल्या जातात ही सर्व माहिती, पूरक पोषण आहाराची माहिती, लसीकरण सर्वांची माहिती मोबाईल ॲपवर भरावी लागते.

-------

मोबाईल ॲपवर अनेक अडचणी

मोबाईल दिल्यापासून अंगणवाडी सेविकांना अनेक अडचणी येत आहे. मोबाईल माहिती भरत असताना हॅग होणे, एकदा अर्जच डाऊनलोड न होणे यासारख्या अडचणी येत आहेत.

--

मोबाईल ॲप अद्ययावत करण्याचे काम सुरू

गेल्या काही दिवसांपासून मोबाईल ॲप अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे. यामुळेच सध्या मोबाईलवर माहिती भरणे बंद आहे. संपूर्ण राज्यातच ही परिस्थिती आहे. शासनाकडून आदेश येतील तशी अंमलबजावणी सुरू होईल.

- दत्तात्रय मुंडे