कारागृहात पुन्हा मोबाइल

By Admin | Updated: May 26, 2014 05:12 IST2014-05-26T05:12:14+5:302014-05-26T05:12:14+5:30

येरवडा कारागृहाच्या सुरक्षा विभाग २ मध्ये एका कैद्याकडे घेतलेल्या झडतीत पुन्हा मोबाइल आढळून आला आहे

Mobile again in jail | कारागृहात पुन्हा मोबाइल

कारागृहात पुन्हा मोबाइल

पुणे : येरवडा कारागृहाच्या सुरक्षा विभाग २ मध्ये एका कैद्याकडे घेतलेल्या झडतीत पुन्हा मोबाइल आढळून आला आहे. गेल्या २ महिन्यांच्या काळात कारागृहात मोबाइल सापडण्याची ही तिसरी घटना उजेडात आल्याने खळबळ उडाली आहे. येरवडा कारागृहाच्या प्रवेशव्दारावर कसून झडती घेतली जात असतानाही मोबाइल आतमध्ये जातातच कसे, याबाबतचे गूढ मात्र अद्याप कायम आहे. येरवडा कारागृहाचा अतिसुरक्षा विभाग असलेल्या अंडासेलमध्ये मोबाइल आढळून आल्याचे ‘लोकमत’ने नुकतेच उजेडात आणले होते, त्यानंतर कारागृहात मोबाइल जॅमर बसविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचे कारागृहाच्या महानिरीक्षक मीरा बोरवणकर यांनी स्पष्ट केले होते. मोबाइल जॅमरची यंत्रणा बसविण्यास एक महिन्याचा अवधी लागणार आहे. या पार्श्वभूमीवर कारागृहात आणखी एक मोबाइल आढळून आला आहे. सुरक्षा विभाग दोनमध्ये नीलेश घायवळ टोळीतील गुन्हेगारांना ठेवण्यात आले आहे. तिथे शनिवारी झडती घेत असताना मोबाइल आढळून आला. (प्रतिनिधी)

Web Title: Mobile again in jail