शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
3
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
4
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
5
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
6
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
7
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
8
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
9
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
10
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
11
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
12
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
13
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
14
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
15
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
16
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
17
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
18
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
19
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
20
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
Daily Top 2Weekly Top 5

दोन्ही पद्धतीने अर्ज सादर करण्याला मनसेचा आक्षेप

By admin | Updated: January 24, 2017 02:46 IST

उमेदवारी अर्ज आॅनलाइन सादर करायचा हे ठीक आहे; मात्र पुन्हा त्याची प्रतही सादर करायची, या प्रकारावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्षेप

पुणे : उमेदवारी अर्ज आॅनलाइन सादर करायचा हे ठीक आहे; मात्र पुन्हा त्याची प्रतही सादर करायची, या प्रकारावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्षेप घेतला आहे. आॅनलाइन अर्ज करणे सक्तीचे केले आहे; पण एखादा उमेदवार संगणक निरक्षर असेल तर त्याने काय करायचे, असाही मुद्दा मनसेने उपस्थित केला आहे. संगणक निरक्षर उमेदवाराला आॅनलाइन अर्जासाठी सहायकाची मदत घ्यावी लागणार. या सहायकाकडून नकळत किंवा हेतुपुरस्पर चूक झाली तर त्याची जबाबदारी कोणावर? निवडणूक अर्ज भरण्याच्या काळात इंटरनेटमध्ये बिघाड किंवा इतर तांत्रिक बाबींमुळे उशीर झाला तर? सर्वर डाऊन झाला तर काय करायचे?  बी. फॉर्म उमेदवाराने अपलोड करायचा आहे तो अपलोड झाला नाही तर? असे प्रश्न मनसेचे शहराध्यक्ष हेमंत संभूस, अजय शिंदे, बाळासाहेब शेडगे यांंनी उपस्थित केले आहेत.आॅनलाइन अर्ज सादर केला, त्याचा संकेतांक मिळाला की पुन्हा त्याच अर्जाची प्रिंट काढून तो अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर करायचा, हा अनाकलनीय प्रकार असल्याची टीका त्यांनी केली आहे. एकतर बदलत्या युगाप्रमाणे तरी वागा किंवा मग पारंपरिक पद्धतच सुरू ठेवा, अशी मागणी मनसेने केली आहे. (प्रतिनिधी)