शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Pune Porsche Accident: आमदार सुनील टिंगरेंची पोलिसांकडून ३ ते ४ तास चौकशी; चौकशीचा अहवाल मात्र गुलदस्त्यात..

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2024 18:52 IST

कल्याणीनगर अपघाताप्रकरणी पुणे पोलिसांकडून तब्बल तीन ते चार तास आमदार सुनील टिंगरे यांची चौकशी करण्यात आली

किरण शिंदे

पुणे : पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील टिंगरे यांची पुणे पोलिसांनी चौकशी केली.  पुणे पोलिसांकडून तब्बल तीन ते चार तास आमदार सुनील टिंगरे यांची चौकशी करण्यात आली. पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आमदार सुनील टिंगरे यांना चौकशीसाठी बोलावलं होते. मात्र या चौकशी मधून काय निष्पन्न झाले हे अद्याप समोर आले नाही. 

पुण्यातील कल्याणी नगर परिसरात १९ मे च्या पहाटे हा अपघात झाला होता. बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांच्या अल्पवयीन मुलाने भरधाव वेगात आलिशान पोर्शे कार चालवत दोघांचा जीव घेतला होता. अश्विनी कोष्टा आणि अनिश अवधिया या दोन तरुणांचा या घटनेत जीव गेला होता. बड्या बापाचा मुलगा असलेल्या अल्पवयीन कारचालकाने मद्याच्या नशेत कार चालवण्याचा आरोप आहे. अपघातानंतर अल्पवयीन कारचालक पळून जाण्याचा प्रयत्न होता. मात्र घटनास्थळी उपस्थित असणाऱ्या नागरिकांनी त्याला पकडून मारहाण करत पोलिसांच्या हवाली केले होते. 

दरम्यान या संपूर्ण घटनेनंतर अल्पवयीन कारचालकाला वाचवण्यासाठी आमदार सुनील टिंगरे यांनी दबाव आणल्याचा आरोप आहे. अल्पवयीन कारचालकाची बाजू घेत आमदार सुनील टिंगरे येरवडा पोलीस ठाण्यात गेले होते असा देखील आरोप करण्यात येतोय. मात्र आमदार सुनील टिंगरे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले. माझ्या मतदारसंघात ही घटना घडल्याने माहिती घेण्यासाठी गेलो होतो असे स्पष्टीकरण त्यांच्याकडून देण्यात आले होते. 

मात्र असे असले तरीही या अपघाताशी संबंधित असणाऱ्या प्रत्येकाची पुणे पोलिसांनी चौकशी केली. असे असताना आमदार सुनील टिंगरे यांना पोलीस चौकशीसाठी का बोलावत नाही असा प्रश्न वारंवार विचारला जात होता. मात्र आता पुणे पोलिसांनी तीन ते चार तास आमदार सुनील टिंगरे यांची या प्रकरणात चौकशी केल्याची माहिती समोर येत आहे. चौकशीत नेमकी काय निष्पन्न झाले हे मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही. 

पुणे पोलीस काय दडवतायत? 

पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी रविवारी झालेल्या एका कार्यक्रमात सुनील टिंगरे यांची चौकशी झाल्याचे सांगितले. मात्र पुणे पोलिसांकडून याविषयी अद्याप कुठलीही माहिती दिली जात नाही. आमदार महोदयांच्या चौकशीतून नेमके काय निष्पन्न झाले हे देखील स्पष्ट होत नाही. त्यामुळे पुणे पोलीस नेमकं काय लपवत आहेत असा प्रश्न देखील या निमित्ताने उपस्थित होत आहे. 

टिंगरेंची झालेली चौकशी पुणे पोलीस का लपवतायेत? 

पोर्शे कार अपघातानंतर गर्भश्रीमंत असलेल्या बिल्डरपुत्राला वाचवण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नामुळे पुणे पोलिसांवर चहुबाजूनी टीका झाली. त्या घटनेनंतर पुणे पोलिसांच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगली गेली. पोलिसांच्या विश्वासाहर्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. त्यावेळी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्वतः समोर येऊन प्रत्येक प्रश्नांची उत्तरे दिली होती. आता मात्र आमदार टिंगरे याची झालेली चौकशी पुणे पोलीस का लपवत आहेत असा प्रश्न विचारला जात आहे.

टॅग्स :PuneपुणेPune Porsche Accidentपुणे पोर्श अपघातPoliceपोलिसMLAआमदारsunil tingreसुनील टिंगरेPorscheपोर्शेAccidentअपघात