आमदार ज्ञानेश्वर कटकेंची मर्सिडीज कार चार वर्षांच्या मुलीला धडकली; अपघाताचा CCTV व्हिडिओ आला समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 10:14 IST2025-12-01T09:58:10+5:302025-12-01T10:14:56+5:30
आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या भरधाव कारने ४ वर्षीय बालिकेला जोरदार धडक दिली.

आमदार ज्ञानेश्वर कटकेंची मर्सिडीज कार चार वर्षांच्या मुलीला धडकली; अपघाताचा CCTV व्हिडिओ आला समोर
पुणे जिल्ह्यातील आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या भरधाव कारने ४ वर्षीय बालिकेला जोरदार धडक दिल्याची घटना रविवारी (३० नोव्हेंबर) दुपारी शिरूरच्या बोऱ्हाडेमळा येथे पुणे-अहिल्यानगर महामार्गावर घडली. या अपघातामध्ये शुभ्रा बोऱ्हाडे (०४) असे तिचे नाव आहे. ती गंभीर जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. मुख्य रस्त्यावर अचानक ही मुलगी पळत आल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आमदार ज्ञानेश्वर कटके हे वाघोली येथून शिरूर नगरपरिषदेच्या प्रचारासाठी रविवारी दुपारी शिरूर येथे येत होते. बोऱ्हाडे मळा येथील हुंदाई शोरूम समोर शुभ्रा बोऱ्हाडे ही चार वर्षीय बालिका महामार्ग ओलांडत होती. एका कारच्या आडून ती अचानक आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या काळ्या रंगाच्या मर्सिडीज कार (क्र. एमएच१२, एनएक्स १३९१) समोर आली.
अचानक ती मुलगी समोर आल्यानंतर चालकाने ब्रेक दाबला. पण कारचा वेग जास्त असल्यामुळे त्या मुलीला जोरदार धडक बसली. त्या मुलीला लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत.
आमदार ज्ञानेश्वर कटकेंची मर्सिडीज कार चार वर्षांच्या मुलीला धडकली; अपघाताचा CCTV व्हिडिओ आला समोर pic.twitter.com/HqTTDzPLHJ
— Lokmat (@lokmat) December 1, 2025