शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

...म्हणून मला पुणे शहराध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करावे..! राष्ट्रवादीचे चेतन तुपे यांचा राजीनामा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2021 2:07 PM

शहराची धुरा कोणाकडे? : इच्छुकांचे जोरदार लॉबिंग सुरू 

ठळक मुद्देमी स्वहितापेक्षा पक्षहिताला प्राधान्य देणारा कार्यकर्ता

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे शहाराध्यक्ष आमदार चेतन तुपे यांनी शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. ऑगस्ट २०१८ पासून ते शहराध्यक्ष म्हणून काम पहात होते. आगामी महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने राष्ट्रवादीने शहरात संघटनात्मक बदल करण्यास सुरुवात केली असून तुपे यांचा राजीनामा ही त्याची सुरुवात असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, शहराध्यक्षपदासाठी अनेक धुरंदर मैदानात उतरले असून पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे जोरदार लॉबिंग सुरू करण्यात आले आहे. 

दहा वर्षांपूर्वी काँग्रेसकडून महापालिकेची सत्ता राष्ट्रवादी काँग्रेसने खेचून आणली. त्यानंतर, शहरात राष्ट्रवादीचे वजन वाढले. संघटनात्मक ताकदही वाढली होती. मात्र, मोदी लाटेत २०१७ साली राष्ट्रवादीची महापालिकेतील सत्ता गेली. भारतीय जनता पक्ष ९८ नगरसेवकांसह भाजपाने पालिकेची सत्ता हस्तगत केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण यांची दुसऱ्यांदा राज्यसभेवर निवड झाल्यानंतर ऑगस्ट २०१८ मध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसने पालिकेतील तत्कालीन गटनेते चेतन तुपे यांच्याकडे शहराध्यक्षपदाची जबाबदारी दिली होती. मात्र, विधानसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीने शहरातील हडपसर आणि वडगाव शेरी मतदार संघ भाजपाकडून खेचून आणले. आमदार झालेल्या तुपे यांनी अन्य व्यक्तीला कामात संधी मिळावी याकरिता शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. राजीनामा देतानाच काही नावाची शिफारसही त्यांनी केली होती. 

शहराध्यक्ष बदलाचा निर्णय दिड वर्ष लांबणीवर पडला होता. दरम्यान पक्षातील दिग्गज नगरसेवकांचे शहाराध्यक्षपदाची माळ आपल्या गळ्यात पाडावी याकरिता जोरदार प्रयत्न सुरू होते. तुपे यांच्या राजीनाम्यानंतर हे इच्छुक पुन्हा कामाला लागले आहेत. माजी महापौर प्रशांत जगताप, दत्ता धनकवडे, माजी सभागृह नेते सुभाष जगताप, नगरसेवक दीपक मानकर, पर्वती मतदार संघाचे अध्यक्ष नितीन कदम आदींचा यामध्ये समावेश आहे. पक्षाचे वरिष्ठ नेते काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे. -----२०१७ साली पालिकेच्या निवडणुकीनंतर सत्तेत असलेला राष्ट्रवादी पक्ष विरोधी बाकांवर बसला. गेल्या पाच वर्षात भाजपाला प्रकल्प आणि विकासमकामे पूर्ण करण्यात आलेले अपयश पाहता राष्ट्रवादीला पुन्हा सत्तेत येण्याची संधी असल्याचे मत जाणकार व्यक्त करीत आहेत. शहराध्यक्ष बदलण्यात आल्यानंतर संघटनात्मक पातळीवर महत्वाचे बदल केले जाण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाला पुन्हा उभारी देण्याचा हा प्रयत्न आहे.   ----शहराध्यक्षपदी एसी, ओबीसी की ओपनराष्ट्रवादीच्या शहराध्यक्षपदासाठी आजी माजी दिग्गज आणि पालिकेतील महत्वाची पदे भूषविलेले नगरसेवक इच्छुक आहेत. यामध्ये एससी, ओबीसी आणो ओपन अशा तीनही गटातील इच्छुकांचा समावेश आहे. त्यामुळे शहराध्यक्षपद कोणाकडे जाणार याकडे लक्ष लागले आहे.----खासदार एड. वंदना चव्हाण यांनी सलग आठ वर्षे शहराध्यक्षपद सांभाळले होते. महिलाही पक्षाची धुरा सांभाळू शकतात. त्यामुळे शहाराध्यक्षपद महिलेला मिळावे अशी अपेक्षाही काही महिला नागरसेविकांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :PuneपुणेNCPराष्ट्रवादी काँग्रेसHadapsarहडपसरMLAआमदारJayant Patilजयंत पाटील