शहरं
Join us  
Trending Stories
1
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
2
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
3
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
4
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
5
तुम्ही तर रक्ताचे होतात, मग का असं केलं?; छगन भुजबळांचा राज ठाकरेंवर पलटवार
6
मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय"; शरद पवारांची टीका
7
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
8
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
9
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
10
'भाजपचे सरकार कायम राहणार नाही, आज ना उद्या नक्की बदला घेईन', ममता बॅनर्जींचा इशारा
11
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध गुजरात टायटन्स सामना रद्द? समोर आले मोठे अपडेट्स
12
स्वत: फुटबॉलपटू असलेली आईच बनली लेकाची कोच आणि म्हणून.. सुनील छेत्रीच्या फुटबॉलप्रेमाची खास गोष्ट!
13
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
14
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
15
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
16
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
17
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
18
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
19
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
20
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव

एम आय टी कॉलेजच्या वाहनांमुळे परिसरातील सोसायट्यांना त्रास; नागरिकांचा आंदोलनाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2022 4:13 PM

कोथरुड भागात एम आय टी कॉलेज असून शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांची संख्या हजारोने आहे

कोथरुड : भागातील एम आय टी कॉलेज परिसरातील बहुतांश रस्त्यांवर चारचाकी वाहने बेकायदा पार्किंग केली जात असल्याने सतत वाहतूक कोंडीचा त्रास सिग्मा सोसायटी व अन्य सोसायटीच्या नागरिकांना सहन करावा लागतो आहे. त्यामुळे सुरळीत वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या या वाहनांवर कारवाई करण्याची मागणी कोथरुड भागातील एम आय टी परिसरातील सोसायटीच्या माध्यमातून  केली जात आहे. कोथरुड भागात एम आय टी कॉलेज असून शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांची संख्या हजारोने आहे. एम आय टी कॉलेज मागील गेट परिसरातील या भागातील सिग्मा वन, शिल्पा सोसायटी, अभिलाषा सोसायटी, सावली सोसायटी, गिरीजा सोसायटी, यशश्री सोसायटी या सारख्या असंख्य सोसाट्या आहेत. येतील रहिवाशांना कामांकरिता जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. येथील वाहतूक कोंडीतून बाहेर पडण्यासाठी २० ते २५ मिनिटं कालावधी लागतो. विद्यार्थी एमआयटी कॉलेज मध्ये प्रवेश करताना आपल्या दुचाकी आणि चारचाकी वाहने रस्त्याच्या दुतर्फा लावत आहेत. या वेळेस एम आय टी मधील कोणताही अधिकारी किंवा सुरक्षा रक्षक त्यांच्या विद्याथ्र्यांचे नियंत्रण करण्याकरिता तिथे उपस्थित राहत नाहीत.असे येथील सोसायटीच्या नागरिकांचे म्हणणे आहे. या समस्यासंदर्भात येथील सोसायटीच्या माध्यमातून खेदपूर्वक निवेदन केले जात आहे. एम आय टी आपल्या परिसरात सर्व विद्याथ्र्यांच्या गाड्यांचे अंतर्गत पार्किंग करण्याची व्यवस्था करत नाही. एम आय टी मधील असणाच्या प्रशस्त मैदानावर पार्किंगची व्यवस्था करण्याऐवजी त्या मैदानाचा उपयोग सेमिनार करण्याकरिता करीत असते त्यांच्या परिसरामध्ये सर्व विद्यार्थ्यांची पार्किंगची व्यवस्था करीत नाही सभोवताली राहणाऱ्या नागरिकांना व दररोजचा  दुर्गंधी सहन करावी लागते.

शिल्पा सोसायटी आणि सिग्मा सोसायटी या मधील रस्त्याच्या उजव्या बाजूस मोठ्या प्रमाणात बांधकाम चालू आहे आणि त्याकरिता मटेरियल घेऊन येणारे आणि बांधकामाचा राडारोडा घेऊन जाणारे असंख्य ट्रक्स, डम्पर्स, लॉरी, जेसीबी यांच्या येण्याजाण्यामुळे रस्त्यावर घाण- राडारोडा पडलेला असतो. अशा वाहनांच्या येण्याजाण्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना व शाळकरी मुलांना रस्त्यावरून जाणे येणे धोकादायक झालेले आहे. असे निवेदन सोसायटीच्या वतीने वाहतूक विभाग व एम आय टी कॉलेज ला दिले आहे. या समस्यावर तोडगा न काढल्यास सोसायटीच्या माध्यमातून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. 

''सदर परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रचंड त्रास होत आहे. बेजबाबदारपणे सोसायटी लगत  वाहने लावली जात आहे. दिवसभर व रात्रीही येथे गर्दी असते. एम आय टी च्या विद्यार्थी व व्हिजिटिंग साठी आलेले वाहने याचा आम्हाला आमच्या वाहनांना त्रास होतो.आम्ही या समस्ये एम आय टी ला असंख्य पत्र पाठवले आहे . तसेच वाहतूक विभागालाही आम्ही पत्र दिले आहे. परंतु कोणीही दखल घेत नाही. समस्यांचे निराकरण न झाल्यास आंदोलन केले जाईल. -  ऍड. रामचंद्र निर्मल( चेअरमन)''

''रात्री या परिसरात ट्रक, टिप्पर, मोठी वाहने राडावरोडा टाकतात याचा आम्हला खूप त्रास होत आहे. रस्त्याच्या कडेला मोठी वाहने असून रस्त्याने जा-ये करण्यासाठी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एम आय टी च्या विद्यार्थ्यांना त्यांच्या कॉलेजमध्ये पार्किंग व्यवस्था करावी. कॉलेज मध्ये वाहने पार्किंग करून देत नाहीत असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांची वाहने सोसायटी परिसरातील भागात लावली जातात. - अस्मिता सोमण (सोसायटीतील रहिवाशी.)'' 

टॅग्स :PuneपुणेkothrudकोथरूडPoliceपोलिसmitएमआयटीcollegeमहाविद्यालयTrafficवाहतूक कोंडी