शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

पुणे महापालिकेच्या भांडार विभागात गैरकारभार; कोट्यवधींचे साहित्य धूळखात, २० अधिकाऱ्यांना नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 13:15 IST

भांडार विभाग, घनकचरा व्यवस्थापन विभाग व लेखा व वित्त विभाग यांनी केवळ ठेकेदारांची बिले काढण्यात धन्यता मानल्याने महापालिकेचे २ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप मनसेने केला होता

पुणे : महापालिकेच्या भांडार विभागामध्ये कर्मचाऱ्यांच्या गणवेशाचे कापड, साड्या नऊ वर्षांपासून, तर इकोचिप पावडर दोन वर्षांपासून पडून असल्याचे समोर आल्यानंतर महापालिका आयुक्तांनी नेमलेल्या चौकशी समितीने आपला अहवाल सादर केला आहे. त्यानुसार महापालिकेच्या उपायुक्तपदावरील अधिकाऱ्यांसह एकूण २१ अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस दिल्या आहेत.

भांडार विभागाने २०१५ मध्ये चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांसाठी ७५ लाख रुपयांचे गणवेशाचे कापड, ६९.७१ लाखांच्या साड्या खरेदी केल्या. त्याचे पैसे ठेकेदाराला दिले; पण गेल्या नऊ वर्षांत एकाही कर्मचाऱ्याला गणवेशाचे कापड, साड्या दिलेल्या नाहीत. हे साहित्य वडगाव बुद्रुक येथील सावित्रीबाई फुले अभ्यासिकेत पडून होते. तसेच घनकचरा विभागाच्या मागणीनुसार भांडार विभागाने ५० लाख रुपये खर्च करून ऑगस्ट २०२३ मध्ये २० हजार किलो सिटी वेस्ट ट्रीटमेंट पावडर, ४ हजार लिटर लिक्विड बायोकॅटॅलिस्ट इकोचिपची खरेदी केली होती. याचा वापर न झाल्याने या पावडरचा व लिक्विडमधील रासायनिक घटक कमी झाल्याने त्याचा उपयोग शून्य झाला.

हा प्रकार मनसेचे प्रदेश सरचिटणीस हेमंत संभुस यांनी नोव्हेंबर २०२५ मध्ये उजेडात आणला होता. भांडार विभाग, घनकचरा व्यवस्थापन विभाग व लेखा व वित्त विभाग यांनी केवळ ठेकेदारांची बिले काढण्यात धन्यता मानल्याने महापालिकेचे २ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप संभुस यांनी केला होता. तसेच या प्रकरणाची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी आणि त्यांच्याकडून हा खर्च वसूल करावी, अशी मागणी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे केली होती. त्यानंतर महापालिका आयुक्तांनी अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्या अध्यक्षतेखाली पाच जणांची चौकशी समिती नियुक्त केली होती.

या समितीने आपला अहवाल सादर केला असून यामध्ये दोषी ठरलेल्या २० अधिकाऱ्यांना सामान्य प्रशासनाने कारणे दाखवा नोटीस बजावल्या आहेत. नोटीस बजावलेल्या अधिकाऱ्यांमध्ये भांडार विभागात यापूर्वी काम केलेल्या आणि सध्या इतर विभागांमध्ये वरच्या पदावर कार्यरत असलेल्या तत्कालीन भांडार विभागाचे उपायुक्त, अधीक्षक अभियंता, उपअधीक्षक, कार्यकारी अभियंता, भांडारप्रमुख, वरिष्ठ लिपिक, दक्षता विभागाचे उपायुक्त, घनकचारा विभागाचे तत्कालीन उपायुक्त, कार्यकारी अभियंता, उपअभियंता, कनिष्ठ अभियंता, विद्युत विभागातील अभियंता, अधीक्षक अभियंता आदींचा समावेश आहे. कारणे दाखवा नोटीस बजावलेल्यांमध्ये चार सेवानिवृत्त अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

सततच्या पाठपुराव्यामुळे मध्यवर्ती भांडारगृहाच्या गैरकारभारामध्ये दोषी असलेल्या २० अधिकाऱ्यांची नावे उघड झाली आहेत. त्या सर्वांना आयुक्तांनी कारणे दाखवा नोटीस पाठवल्या होत्या. त्यातील फक्त १२ जणांनी खुलासा केला असून ८ जणांनी अद्याप खुलासा केलेला नाही. खुलासा करण्याची मुदत संपली असल्याने संबंधितांवर कारवाई होणे अपेक्षित आहे. - हेमंत संभुस, प्रदेश सरचिटणीस, मनसे

English
हिंदी सारांश
Web Title : Pune Municipal Corporation's warehouse irregularities: Notices to 20 officials.

Web Summary : Pune Municipal Corporation's warehouse faces scrutiny for mismanagement. Millions worth of materials remain unused, prompting notices to 20 officials, including retired staff, after an inquiry.
टॅग्स :Pune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाcommissionerआयुक्तMONEYपैसाSocialसामाजिकEmployeeकर्मचारीWomenमहिला